Block Development Officer Sachin Khude inspecting incomplete houses.
sakal
इंदापूर - तालुक्यातील घरकुल योजनांतील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी पंचायत समितीने कठोर भूमिका घेतली असून, घरकुल मंजूर होऊन पहिला हप्ता घेतल्यानंतरही बांधकाम सुरू न करणाऱ्या लाभार्थ्यांना अंतिम संधी देण्यात येणार आहे. घरकुलाचे बांधकाम पूर्ण करावे, अन्यथा मिळालेला शासकीय हप्ता परत करावा, असा इशारा गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी दिला.