संगणकाच्या ‘रॅम’चा मेमरीसाठीही उपयोग शक्य

सम्राट कदम
Sunday, 31 January 2021

संगणकाला किंवा मोबाईललाही माहिती (डेटा) साठविण्यासाठी एक आणि तार्किक (लॉजीकल, कॉंप्युटेशन) प्रक्रिया करण्यासाठी दुसरी मेमरी असते. पहिल्या प्रकाराला रीड ओन्ली मेमरी (रॉम), तर दुसऱ्या प्रकाराला रॅन्डम ॲक्सेस मेमरी (रॅम) असे म्हणतात.

आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांचे संशोधन; मायक्रोप्रोसेसर होणार अतिजलद
पुणे - संगणकाला किंवा मोबाईललाही माहिती (डेटा) साठविण्यासाठी एक आणि तार्किक (लॉजीकल, कॉंप्युटेशन) प्रक्रिया करण्यासाठी दुसरी मेमरी असते. पहिल्या प्रकाराला रीड ओन्ली मेमरी (रॉम), तर दुसऱ्या प्रकाराला रॅन्डम ॲक्सेस मेमरी (रॅम) असे म्हणतात. जेवढी रॅम जास्त, तेवढ्या जलद प्रक्रीया संगणकात होतात. आजवर एकाच मेमरीतून ही दोन्ही कामे करण्याचे तंत्रज्ञान आपल्याकडे नव्हते. पण मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) शास्त्रज्ञांनी एकाच मेमरीतून दोन्ही कार्य करण्याचे तंत्रज्ञान प्राथमिक स्तरावर विकसित केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माहितीवर प्रक्रिया करणारी रॅम आणि ती साठविणाऱ्या रॉम मेमरीमधील देवाणघेवाण जलद होण्यासाठी अनेक वर्षांपासून संशोधन चालू आहे. ही देवाणघेवाण जलद झाल्यास मायक्रोप्रोसेसरचा पर्यायाने संगणकाचा वेगही मोठ्या प्रमाणावर वाढेल. आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी नवीन तंत्रज्ञान शोधले असून, ज्यामध्ये विकसित करण्यात आलेली रॅम दोन्ही कारणासाठी एकाचवेळी वापरात येईल. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, सेमिकंडक्टर रिसर्च कॉर्पोरेशन, तसेच इंटेल आणि टेक्सास इंस्टूमेंट यांच्या सहकार्याने डॉ. संदीप लष्करे, डॉ. एस. सुब्रोमोनी आणि डॉ. उदयन गांगुली यांचे हे संशोधन ‘आयईईई इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस लेटर्स’ या शोधपत्रिकेत प्रकाशीत झाले आहे. 

'लोकांची हत्या करणारे मोकाट, तर कवी, विद्यार्थी तुरुंगात; लेखिका अरुंधती राॅय कडाडल्या

काय आहे नवीन तंत्रज्ञान  
संगणकांमध्ये तार्किक प्रक्रियांसाठी ट्रान्झिस्टर वापरले जातात. त्यांच्यामधून नियमित विद्युतधारेचे वहन झाले तर ते प्रक्रिया करतात. एकदा का विद्युतधारा बंद झाली की त्यांच्यातील माहिती पुसली जाते. त्यामुळे दीर्घकाळ माहिती साठविण्यासाठी त्यांचा उपयोग होत नाही. सध्या शास्त्रज्ञ टू टर्मिनल नॅनो डिव्हाईस असलेली ‘रेझिस्टीव्ह रॅम’च्या (आर-रॅम) वापरासंबंधी संशोधन करत आहे. मात्र माहिती साठविणे आणि प्रक्रिया करताना त्यांचा वेग मंदावतो आणि साठवण क्षमताही कमी होते. आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांनी तीन टर्मिनल असलेली ‘आर-रॅम’ विकसित केली आहे. ज्यामध्ये सहजच तार्किक क्रिया आणि माहिती साठवता येते. त्याचबरोर ऊर्जेची बचत आणि मेमरी क्षमताही वाढते.

पुणे : गँग वॉरमध्ये एकाचा खून करणाऱ्या ९ जणांना जन्मठेपेची शिक्षा

तंत्रज्ञानाचे फायदे -

  • जगात प्रथमच दोन्ही कारणांसाठी एक मेमरी वापरणे शक्य असल्याचे सिद्ध
  • भविष्यात दोन्ही कारणांसाठी एकच मेमरी वापरली जाईल
  • संगणक, मोबाईल आदींच्या तार्किक क्रिया करणाऱ्या मायक्रोप्रोसेसरचा वेग आणि क्षमता वाढेल
  • भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित माहिती तंत्रज्ञान युगासाठी मोठी उपलब्धी ठरेल

थ्री टर्मिनल आर.-रॅम विकसित करणे तांत्रिकदृष्ट्या मोठे आव्हान होते. आर.-रॅममधील करंट आणि व्होल्टेजमध्ये होणारे बदल आम्ही नियंत्रित केले आहेत. निश्चितच प्रत्यक्ष उत्पादन आणि वापरासाठी अजून अनेक टप्पे पार करावे लागतील. पण या तंत्रज्ञानामुळे भविष्यात मायक्रोप्रोसेरचा वेग वाढेल याचा विश्वास आहे. 
- प्रा. उदयन गांगुली, शास्त्रज्ञ, आयआयटी मुंबई.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Computer RAM can also be used for memory