आंबेगावकरांची काळजी वाढली, घोडेगावातील दोघांचे रिपोर्ट...

corona
corona

घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्याचे मुंबईचे  कोरोना कनेक्शन पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गिरवली व वळती या गावात प्रत्येकी एक व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आंबेगाव तालुक्यात आता कोरोनाबाधित १० व्यक्ती झाल्या आहेत. सर्वांचे लक्ष लागून राहिलेले घोडेगाव येथील तीनपैकी २ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे घोडेगावकरांची काळजी दूर झाली आहे. मात्र, अजून एका रिपोर्टची प्रतीक्षा आहे.
 

आंबेगाव तालुक्यात साकोरे येथे एक, शिनोली येथे तीन, निरगुडसरला एक, जवळे येथे एक, लांडेवाडी पिंगळवाडी एक, वडगाव काशिंबेग एक, असे आठ रुग्ण सापडली होते. आज गिरवली येथील 45 वयाच्या व वळती येथे पन्नास वर्षाच्या पुरुषाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गिरवली येथील व्यक्ती मुंबईहून 17 मे रोजी आली होती. त्यांना २५ मे रोजी त्यांना पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. वळती येथील पन्नास वर्षाचा रुग्ण 18 मे रोजी मुंबईहून आला होता. त्यांना 25 मे रोजी पुणे येथे पाठविण्यात आले होते.

घोडेगाव येथील तीनपैकी दोन संशयितांची अहवाल निगेटिव्ह आल्याने घोडेगावकरांची टेन्शन दूर झाले आहे. प्रशासनाने गिरवली व वळती येथे पूर्ण नाकेबंदी केली आहे. नागरिक घराबाहेर पडल्यास गुन्हा दाखल करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com