खेड तालुक्यात दोघांच्या मृत्यूने वाढली चिंता

dead_body
dead_body

राजगुरूनगर (पुणे) : खेड तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावांमधील कोरोना लक्षणसादृश्य असलेल्या २ रुग्णांच्या मृत्यूने चिंता निर्माण झाली आहे.

खेड तालुक्यातील कमान येथील अस्थम्याने आणि न्यूमोनियाने अत्यवस्थ असलेल्या ६२ वर्षीय रुग्णाचा पुणे येथील औंध उरो रुग्णालयात आज पहाटे मृत्यू झाला असून, त्यांच्या घशातील द्रावाची तपासणी होणार आहे. त्यानंतरच त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला की नाही, हे समजू शकेल, असे तालुका वैद्यकीय अधिकारी बी. बी. गाढवे यांनी सांगितले. 

तसेच, मुंबईहून वाडा या गावी आलेल्या एका टायफॉईडने आजारी असलेल्या तरुणाचा चांडोली ग्रामीण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याने त्याच्या घशातील द्रावही तपासणीसाठी घेता आला नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू कशाने झाला, याचे रहस्य कायम राहणार आहे. गावोगावी आरोग्य सर्वेक्षण सुरु असून, वाडा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून या रुग्णाची नोंद झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत पिंपरी-चिंचवड येथून कामासाठी येणारा कामगार  कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील २१ व्यक्तींना होम  क्वारंटाइन केले आहे. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com