‘एमटीडीसी’कडून सवलती : निसर्गरम्य ठिकाणे ठरताहेत पर्यटकांचे आकर्षण

शहरातील दररोजची वाहतूक कोंडी, मॉल संस्कृती अशा धकाधकीच्या जीवनाचा नागरिकांना कंटाळा आला आहे.
MTDC tourist Residence in Mahabaleshwar
MTDC tourist Residence in Mahabaleshwarsakal
Summary

शहरातील दररोजची वाहतूक कोंडी, मॉल संस्कृती अशा धकाधकीच्या जीवनाचा नागरिकांना कंटाळा आला आहे.

पुणे - उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस... धुक्याची दुलई, स्वच्छंद आणि मनमोहक धबधबे... शुभ्र खळखळत फेसाळणारे झरे, निसर्गाने पांघरलेला हिरवा गालिचा... आल्हाददायक गुलाबी थंडी हे सगळं प्रत्यक्ष अनुभवायचे असेल तर वर्षा पर्यटनाला जायला हरकत नाही. मात्र, धोकादायक ठिकाणे टाळून सुरक्षित पर्यटन करणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

शहरातील दररोजची वाहतूक कोंडी, मॉल संस्कृती अशा धकाधकीच्या जीवनाचा नागरिकांना कंटाळा आला आहे. त्यातून सुटीच्या दिवशी वीकेंडला शहरापासून दूर निसर्गरम्य ठिकाणी पावसाचा आणि दाट धुक्याचा अनुभव घेण्यास पर्यटकांची गर्दी होत आहे.

सध्या पावसानं थोडी उसंत घेतली आहे. तरी अधून-मधून पाऊस कोसळतो आहे. त्यात हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी. त्यातून वळणे घेत मध्येच येणाऱ्या बोगद्यातून जाणारा रस्ता हे अनुभवताना मन अगदी प्रसन्न टवटवीत होऊन जातं. या वर्षा पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) निसर्गरम्य ठिकाणंही साद घालत आहेत. एमटीडीसीची पर्यटक निवासे निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक ठिकाणी, हिरव्यागार डोंगर रांगा, थंड हवेच्या ठिकाणी आणि जागतिक वारसा स्थळांच्या जवळ आहेत. अपघात टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचेही पालन केल्यास पर्यटनाचा अधिक आनंद लुटता येणार आहे.

‘एमटीडीसी’कडून सोयी सवलती आणि आल्हाददायक वातावरण यामुळे वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. अतिवृष्टीमुळे प्रशासनाने काही ठिकाणी पर्यटकांना बंदी केली आहे. तथापि पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर पर्यटन बंधमुक्त होणार आहे. त्यामुळे वर्षा पर्यटनास बहर येणार आहे.

- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी

‘एमटीडीसी’ची पर्यटक निवासे

औरंगाबाद, अजंठाजवळ फर्दापूर, लोणार सरोवर, नाशिक विभागातील ग्रेप पार्क, भंडारदरा, पुणे विभागातील महाबळेश्वर, लोणावळा (कार्ला), माळशेज घाट, माथेरान, कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, गणपतीपुळे ही ठिकाणे पर्यटकांची मुख्य आकर्षणे ठरत आहेत.

हे टाळा...

  • जीव धोक्यात घालून सेल्फी काढणे

  • निसरड्या धबधब्यांच्या ठिकाणी जाणे

  • अनोळखी जंगलातून भ्रमंती

‘एमटीडीसी’कडून सवलत

१) पर्यटक निवासाच्या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग

२) ज्येष्ठ नागरिक, सरकारी कर्मचाऱ्यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलत

३) आजी-माजी सैनिक, दिव्यांगांसाठी सवलत

४) ग्रुप बुकिंगसाठी सवलत

५) शालेय सहल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com