राजगड पायथ्याला गरुड झेप मोहिमेची सांगता

आग्र्यावरून १७ ऑगस्टपासून सुमारे ६० मावळे दररोज शंभर ते सव्वाशे किलोमीटर पायी शिवज्योत घेऊन निघाले होते, ते आज सकाळी राजगड पायथ्याशी पोहोचले.
Garudzep Campaign
Garudzep CampaignSakal
Updated on

वेल्हे (पुणे) - आग्र्यावरून औरंगजेबाच्या तावडीतून छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) निसटलेल्या घटनेस ३५५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आग्रा (Aagra) ते राजगड (Rajgad) बाराशे पन्नास किलोमीटर शिवज्योत (Shivjyot) घेऊन पायी निघालेल्या मोहिमेची सांगता कार्यक्रम आज (ता. २९) रोजी राजगडच्या पायथ्याशी खंडोबा माळावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

आग्र्यावरून १७ ऑगस्टपासून सुमारे ६० मावळे दररोज शंभर ते सव्वाशे किलोमीटर पायी शिवज्योत घेऊन निघाले होते, ते आज सकाळी राजगड पायथ्याशी पोहोचले. याठिकाणी शिवज्योत घेऊन येणाऱ्या मावळ्यांची जोरदार स्वागत करण्यात आले.

ढोल-ताशांच्या निनादात फुल भंडारा उधळून छत्रपतींच्या जयघोषाने किल्ले राजगड पायथा दुमदुमला. यानिमित्त अठरागाव मावळ परिसरातील नागरिक, शिवप्रेमी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲड. मारुती गोळे गरुडझेप मोहीम प्रमुख, दिग्विजय जेधे, अनिल पवार, महेश मालुसरे, मंदार मते, विनायक दारवटकर, अशोक सरपाटील, हनुमंत जांभूळकर, श्रीनिवास कुलकर्णी, राजेश सातपुते, गणेश जाधव, महेश मालुसरे आदींचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे गणेश खुटवड, राष्ट्रवादीचे संतोष रेणुसे, मकरंद शिंदे, योगेश रेणुसे, मावळा संघटनेचे बाळाजी सणस, रवींद्र कंक, प्रदीप मरळ, करणसिंह बांदल, मंगेश शिळीमकर, राहुल नलावडे आदींसह पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच आदीसह विविध गडप्रेमी संस्था शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Garudzep Campaign
सावधान ! पुढील स्टेशन पोलिस स्टेशन

छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचा जागर देशवासीयांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहण्यासाठी व व युवकांना फिटनेसचा संदेश देण्यासाठी २०१७ साली एकट्यानेच आग्रा ते राजगड मोहीम केली होती. परंतु यावर्षी साठ मावळ्यांना घेऊन ही मोहीम करण्यात आली. ही मोहीम भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तमाम भारतीयांना समर्पित करीत आहोत.

- ॲड .मारुती गोळे, आग्रा ते राजगड गरुड झेप मोहीम प्रमुख

मोहिमेची वैशिष्ट्ये

१) मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांच्या लसीकरणाचे दोन डोस पूर्ण

२) शिव स्मरण मार्गावर ठिकठिकाणी शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रदर्शन

३)आग्रा ते राजगड मार्गावर दोन हजार पेक्षा अधिक विविध देशी झाडांचे बीजारोपण

४)महाराष्ट्रातील पंचावन्न किल्ल्यांवरील पाण्याने आग्र्यातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास व राजगडावरील पुतळ्यास अभिषेक

५)किल्ले राजगडावरील माती आग्र्यामध्ये तर आग्रा मधील माती किल्ले राजगडावर आणून वृक्षरोपण करण्यात आले.

मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या प्रमुख शिवप्रेमी संस्था

१) नरवीर पिलाजी प्रतिष्ठान

२) नरवीर तानाजी मालुसरे प्रतिष्ठान

३) वेस्टन घाट रनिंग फाउंडेशन

४) शिवदुर्ग संवर्धन संस्था कोंडवे धाडवे

५) गड भटकंती दुर्ग संवर्धन संघटना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गडकोटांवर पर्यटकांना बंदी असल्याने वेल्हे पोलिसांनी गरुडझेप मोहिमेतील पाच ते दहा युवकांना राजगड किल्ल्यावर प्रवेश दिला असल्याची माहिती वेल्हेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com