
पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजूर वर्गाने मोठ्या संख्येने गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकजण मिळेल ते वाहन पकडून घरी जात आहेत. गरिबीने आधीच खचलेला आयुष्याचा संसार कोरोनाने रस्त्यावर आणला आहे. यातच भर म्हणून गुरुवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे खचलेल्या मनःस्थितीत चालत जाणाऱ्या अनेक कामगारांची मोठी वाताहत झाली. तर वाघोली येथील उबाळे नगर येथून छत्तीसगड येथे जाण्यासाठी गाडी मिळते या अफवेमुळे हजारो कामगार या परिसरात जमा झाले होते. कोरोनाच्या संसर्गापेक्षा पोटाची भूक जिवंत राहण्यासाठी गरजेची आहे, हे अनुभवून या कामगारांनी अफवांवर विश्वास ठेवून गावची वाट चालायला सुरुवात केली होती.
पुण्यातील आंबेगाव, नऱ्हे, सुसगाव, पिंपरी, कात्रज यासह काही परिसरातील कामगार मोठ्या प्रमाणात गावी जाण्यासाठी गाडी मिळेल या आशेमुळे उबाळे नगर परिसरात जमले होते. मात्र अनेक ट्रॅव्हल एजंट, ट्रक ड्रायव्हर हे कामगारांना नागपूर, गोंदिया सीमेवर सोडवण्यासाठी २५०० ते ३००० हजार रुपये तिकीट आकारात असल्याचे निदर्शनास आले आहे. हा तिकिटाचा आकडा मोठा असला तरीही गावी जाण्यासाठी कामगार वाटेल तेवढे पैसे मोजण्यासाठी तयार होत आहे. ट्रक ड्रायव्हर, ट्रॅव्हल एजंट यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर कामगारांची लूट सुरू असून परस्पर सुरू असलेल्या या गैरव्यवहाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
या परिसरात जमा झालेल्या अनेक कामगारांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. विश्वकर्मा, छत्तीसगड येथील बलराम यादव म्हणाले, दोन महिन्यापासून काम नाही. जेवढे साठवलेले पैसे शिल्लक होते त्यावर दोन महिने गुजराण केली. आता बाहेर पडणच शक्य नसल्यामुळे गावी जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. इथे सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही. रेशन मिळाले नाही. त्यामुळे पोटाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. दोन छोट्या मुली, एक मुलगा, बायको असा परिवार आहे. त्यांना काय खाऊ घालू हा प्रश्न आहे. गावी परिस्थिती इतकी चांगली नसली तरी तिथे रेशन मिळेल. त्यावर गुजराण होईल.
पुण्यात धानोरी येथे राहणारे मूळचे कांता, मुंगेली, छत्तीसगड येथील अमित यादव म्हणाले, "माझ्यासह बायको, दोन छोटी मुले, भाऊ असा परिवार आहे. गावी जायचे आहे. सरकार परवानगी देत नाही. जवळ पैसे नाहीत. गावी पण गरिबी आहे. त्यामुळे जाण्यासाठी पैसे नाहीत. कसे जाऊ हा प्रश्न पडला आहे.
खायला नाही त्यामुळे गावी जात आहे. सरकार कडून मदत मिळत नाही. गावी गेलेल्या माणसांनी सांगितले उबाळे नगर, वाघोली येथून जाण्यासाठी विना शुल्क बस आहेत. परंतु इथे ट्रक जाण्यासाठी मिळाली आहे. ते २५०० -३०० प्रत्येक माणसाला तिकीट घेत आहेत. सगळे फक्त येऊन विचारतात. परंतु मदत अद्याप कोणीही केलेली नाही. -गंगुबाई यादव, विश्कर्मा, छत्तीसगड.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.