
what's Hot या वेबसाईटवर हुक्कयाची जाहिरात करण्यात येत असून तेथे मोबाईल क्रमांक टाकल्यास घरपोच हुक्का दिला जात असल्याची खबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांना मिळाली होती.
पुणे : संचार मनाई आदेश असल्याने अनेक कायदेशीर व बेकायदा हुक्का पॉर्लर बंद आहेत. मात्र हुक्का पिणाऱ्या ग्राहकांना मात्र हुक्का पिण्याची तल्लफ काही स्वस्थ बसु देईना, त्यामुळे अशा ग्राहकांचा शोध घेऊन त्यांना आता हुक्क्याची "होम डिलीव्हरी" सेवा होऊ लागली आहे. हुक्का घरपोच देणाऱ्या तिघाना गुन्हे शाखेच्या पथकाने बेडया ठोकुन त्यांच्याकडुन एक लाख रुपयांचा माल जप्त केला.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मित विजय ओसवाल (वय १९ रा. वानवडी बाजार), रॉयल जयराम मधुरम (वय २८ रा. लुल्लानगर, कोंढवा), परमेश महेश ठक्कर (वय २४ रा. भवानी पेठ) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
what's Hot या वेबसाईटवर हुक्कयाची जाहिरात करण्यात येत असून तेथे मोबाईल क्रमांक टाकल्यास घरपोच हुक्का दिला जात असल्याची खबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने त्यांना मिळालेल्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषन करुन बनावट ग्राहकसमवेत पोलिस उपनिरीक्षक, महाडिक, पोलिस कर्मचारी मगर ,गुरव, गरुड, साबळे व चौधर यांचे पथक कोंढ़वा येथील लुल्ला नगर परिसरातील धर्मादास लुल्लागार्डन येथे सापळा लावला. तेथे हुक्का विक्री करण्यासाठी तिघेजण आले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारणा केली, तेव्हा तिघेजण हुक्क्याचीही "होम डिलीव्हरी" करत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे विद्यापीठ करतेय तब्बल 'एवढ्या' विद्यार्थ्यांच्या परिक्षेसाठी नियोजन
पोलिसांनी त्यांची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडुन सहा हुक्का पॉट,सहा पाकीट तंबाखूजन्य फ्लेवर, चार मोबाईल फोन, दोन मोपेड गाड्या असा एकूण एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात स्टेशन कोटपा कायदा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, महाराष्ट्र कोविड संसर्गजन्य रोग कायदा या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
मजुरांच्या रेल्वे भाड्यासाठी पुणे जिल्ह्याला मिळणार 'एवढी' रक्कम!