मोफत प्लॅस्टिक सर्जरी निदान शिबिराचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

‘सकाळ सोशल फाउंडेशन’ व ‘जहांगीर स्पेशालिटी हॉस्पिटल’ यांच्या संयुक्त सहकार्याने सर्व वयोगटांतील नागरिकांसाठी दोन दिवसीय मोफत प्लॅस्टिक सर्जरी निदान शिबिराचे आयोजन केले आहे.

पुणे - ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ व ‘जहांगीर स्पेशालिटी हॉस्पिटल’ यांच्या संयुक्त सहकार्याने सर्व वयोगटांतील नागरिकांसाठी दोन दिवसीय मोफत प्लॅस्टिक सर्जरी निदान शिबिराचे आयोजन केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हे शिबिर कोथरूड येथील जहांगीर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शनिवार (ता. १५) व रविवारी (ता. १६) सकाळी ११ ते ३ या वेळेत होणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून दुभंगलेले ओठ व टाळू , हात व पायाची चिकटलेली बोटे, नाकावरील व्यंग, जळालेली त्वचा, चेहऱ्यावरील व्रण व व्यंग, मधुमेहामुळे न भरणाऱ्या जखमा, पायावरील फुगलेल्या नसा, स्तनांचे व्यंग, केशरोपण, त्वचारोपण आदी विकारांचे तज्ज्ञांमार्फत मोफत निदान करून शस्त्रक्रियेवर पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क ः 
०२०-२५४३१७५८


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Conduct free plastic surgery diagnostics camp