esakal | महत्वाची बातमी : युपीआयची खात्री करुनच मदत पाठवा - चंद्रशेखर शिसोदे
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrashekhar-Shisode

खरेदी केल्यावर किंवा कुणाला पैसे पाठवायचे असेल, तर आपण अनेकदा ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करतो. त्यासाठी अतिशय सुलभ असलेला 'युपीआय' क्रमांक नोंदवून पैसे 'सेंड' करतो. पण, यात  एखादी चूक झाली तर, पैसे दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात जाऊ शकतात. आणि जर अशी चूक 'पंतप्रधान सहायता निधी' साठी असलेल्या खात्याबाबत झाली  तर, कल्पनाच नको. अशी होणारी संभाव्य चूक एका पुणेकराने उघडकीस आणली  आहे.

महत्वाची बातमी : युपीआयची खात्री करुनच मदत पाठवा - चंद्रशेखर शिसोदे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - खरेदी केल्यावर किंवा कुणाला पैसे पाठवायचे असेल, तर आपण अनेकदा ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करतो. त्यासाठी अतिशय सुलभ असलेला 'युपीआय' क्रमांक नोंदवून पैसे 'सेंड' करतो. पण, यात एखादी चूक झाली तर, पैसे दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात जाऊ शकतात. आणि जर अशी चूक 'पंतप्रधान सहायता निधी' साठी असलेल्या खात्याबाबत झाली  तर, कल्पनाच नको. अशी होणारी संभाव्य चूक एका पुणेकराने उघडकीस आणली  आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाविरुद्धच्या लढाईत नागरिकांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. लोकांना ऑनलाईन पद्धतीने ' पंतप्रधानq सहायता निधी'त योगदान देता यावे, म्हणून एक 'युपीआय'क्रमांक ही जाहीर केला. परंतु, पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या क्रमांकाशी बरेचसे साम्य दाखवणारा खोटा क्रमांकही अस्तित्वात होता. यामुळे क्रमांकात थोडी चूक करणाऱ्या नागरिकांचे लाखो रुपये चूकीच्या व्यक्तीला जाण्याची शक्यता होती.

पाषाण  पंचवटी येथील रहिवासी चंद्रशेखर शिसोदे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. पंतप्रधानांनी  pmcares@sbi वर मदत पाठवा असे आवाहन केले आहे.मात्र याच्याशीच साम्य दाखवणारा, पण ज्यामध्ये शेवटचे  'एस' अक्षर नाही असा pmcare@sbi युपीआय आय डी  अस्तित्वात आहे. त्यामुळे नागरिकांचे पैसे वेगळ्याच खात्यावर जाण्याची शक्यता आहे. हा धोका ओळखून शिसोदे यांनी भारतीय स्टेट बँक आणि पंतप्रधान कार्यालयाला ट्विटर द्वारे कळवले. स्टेट बँकेने याची दखल घेत तातडीने, खोटा असलेला युपीआय क्रमांक हटवला आहे.  नागरिकांनीही सहायता निधी पाठवताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नागरिक  पंतप्रधान सहाय्यता निधीला आर्थिक मदत करणार आहेत . मात्र ती  करताना कृपया खाते क्रमांक आणि युपीआय आय डी नीट तपासूनच पैसे पाठवावेत. 
- चंद्रशेखर शिसोदे

loading image