पुण्यात लसीकरणाच्या नोंदणीत गोंधळ

कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी १८ ते ४४ वयोगटाला रोज रात्री ८ वाजता आॅनलाइन बुकिंग करावे लागते.
Vaccination
VaccinationSakal

पुणे - कोरोना प्रतिबंधक लस (Corona preventive vaccine) घेण्यासाठी १८ ते ४४ वयोगटाला रोज रात्री ८ वाजता आॅनलाइन बुकिंग (Online Booking) करावे लागते. शहरातील हजारो तरुण लसीकरणासाठी (Vaccination) प्रयत्न करत असले तरी त्यांना अपॉइंटमेंट (Appointment) मिळत नाही. आठ वाजता लिंक खुली होत असली तरी पावणेआठलाच बुकिंग ‘फुल’ दाखविले जाते. या ॲपमध्ये मानवी हस्तक्षेप करून मर्जीतील लोकांची आधीच नोंदणी (Registration) होत असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकाराबाबत तरुणांमध्ये (Youth) प्रचंड संताप निर्माण झाला आहे. (Confusion in vaccination registration in Pune)

१३ हजार जणांचे लसीकरण

राज्यात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू केले आहे. शहरात या गटातील लोकसंख्या सुमारे २२ लाख इतकी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याचे आव्हान पुणे महापालिकेसमोर आहे, पण राज्य सरकारकडून १० दिवसांत फक्त १५ हजार लसींचे डोस आले असून सुमारे १३ हजार जणांचे लसीकरण झाले आहे.

१८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी कोवीन, आरोग्यसेतू किंवा उमंग या ॲपवर नोंदणी करून तेथे लसीकरण केंद्र व वेळ निवडावी लागते. त्याचा मेसेज आल्यानंतरच लसीकरणासाठी नोंदणी निश्‍चीत होते. आॅनलाइन नोंदणी अनिवार्य असली तरी पालिकेने नेमकी नोंदणी कधी करायची, त्याची वेळ काय आहे, लसीकरण केंद्रांचा पिनकोड कोणता आहे याबाबत संधिद्धता ठेवली. त्यामुळे गोंधळ होता. नागरिकांना आता पीन कोड व नोंदणीची वेळ माहित झाली असली तरी प्रत्यक्षात नोंदणी करताना प्रचंड अडचणी येत आहेत.

याबाबत कुटुंब नियोजन विभागातील अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, स्लॉटसाठी लिंक ओपन करण्याचे सर्व अधिकार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. शासनाचा यात काही संबंध नाही, असे त्यांनी सांगितले.

Vaccination
महावितरणाच्या कर्मचाऱ्यांवर खासदारांची कौतुकाची थाप

एक मे पासून मी रोज लसीकरणासाठी नोंदणीच्या प्रयत्नात आहे; पण अजूनपर्यंत मला त्यात यश आलेले नाही. रात्री आठपूर्वी लसीकरण केंद्रावर एनए असे दाखविले जाते; पण आठ वाजले की सर्व स्लॉट बुक होतात. तसेच अनेकदा ओटीपी येण्यास उशीर होतो. अशा प्रकारे नोंदणीत गोंधळ असेल तर लसीकरण कधी होणार, हा प्रश्‍नच आहे.

- संदीप शेटकार, चार्टड अकाउंटंट

आॅनलाइन बुकिंगचा इतरांना वाईट अनुभव येत असला तरी मला चांगला अनुभव आला आहे. माझ्यासह माझ्या घरातील दोघांचे मी बुकिंग करून दिले. मी स्वतः सुतार दवाखान्यात लसीकरण केले. पण, नागरिकांचा गोंधळ होत असेल, तर याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण देऊन ही प्रक्रिया पारदर्शक करावी.

- प्राज भिलारे, इंजिनिअर

कोविन ॲपवरून धूळफेक

पुण्यासाठी आठ वाजता आॅनलाइन नोंदणी सुरू होते, पण पावणेआठ वाजताच केंद्रांवरील बुकिंग फुल दाखविले जाते. लशीच्या स्लॉट बुकिंगमध्ये वशिलेबाजी सुरू असून, सामान्य लोक हातात मोबाईल घेऊन बुकिंगसाठी धडपडत आहेत. कोविन ॲपवरून धूळफेक सुरू आहे. याचे पुरावेदेखील उपलब्ध असल्याचे ‘आप’चे राज्य प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे यांनी सांगितले.

काय अडचणी येतात...

  • काही जणांना ओटीपी उशिरा मिळतो.

  • काहींना आठपूर्वी लसीकरण केंद्राच्या पुढे ‘एनए’ दाखवले असताना आठ वाजता बुकिंग फुल झाल्याचे दिसते.

  • अवघ्या १० सेकंदांमध्ये ५०० लशींची नोंदणी फुल होते.

  • आॅनलाइन बुकिंगमध्ये हस्तक्षेप होत असल्याचा संशय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com