महावितरणाच्या कर्मचाऱ्यांवर खासदारांची कौतुकाची थाप

महावितरणाच्या कर्मचाऱ्यांवर खासदारांची कौतुकाची थाप

पुणे- वेल्हे तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळी वा-यामुळे दापोडे परिसरातील वीजेचे दहा ते बारा पोल पडले होते यामुळे परिसरातील ऐंशी पेक्षा अधिक गाव, वाड्या वस्त्या अंधारात होत्या या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महाविरणच्या अधिकारी कर्मचारी यांनी तत्परतेने चोवीस तासात विद्युत पुरवठा सुरळीत केला याबाबत सकाळ मध्ये वृत्त प्रसिध्द झाले होते. याची दखल खासदारांनी घेत महावितरणाच्या अधिकारी कर्मचा-यांवर कौतुकाची थाप दिली आहे. (MPs applaud MSEDCL employees velhe)

वेल्हे तालुकयामध्ये काही दिवसांपासून कमी अधिक पाऊस पडत आहे .२ मे रोजी झालेल्या पावसाचा जोर व वादळी वा-यामुळे कामथडी सबस्टेशनमधून येणा-या मुख्य वाहिनीचे विंझर व पाबे मंडलातील १० ते १२ पोल उन्मळून पडले होते. यामुळे यापरिसरातील ऐंशी पेक्षा अधिक वाड्या वस्त्यांवरील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता तर कोंढावळे येथील कोव्हीड केअर सेंटर मधील बाधित रुग्णांचे मोठे हाल होणार होते. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अधिकारी व कर्मचारी यांनी चिखलात, डोक्या खांद्यावर पोल नेऊन धोकादायक झाडांवरुन ओढण्याचे काम ४५ कर्मचारी यांच्या सहाय्याने करत अवघ्या चोवीस तासाच्या आत विजेचा विद्युत पुरवठा सुरळीत केला होता. याबाबत सकाळ डिजीटल व दैनिक सकाळ मध्ये वेल्ह्यात फिटे अंधाराचे जाळे या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द होताच याची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली. याबाबत फेसबुकवर पोस्ट करत महावितरणच्या कर्मचा-यांचे कौतुक केले.

महावितरणाच्या कर्मचाऱ्यांवर खासदारांची कौतुकाची थाप
वेल्हे तालुक्यातील रानवडी येथील ४६ वृध्दांची कोरोनावर मात

बारामती लोकसभा मतदार संघाचे समन्वयक प्रविण शिंदे यांच्या मार्फत वेल्हे येथे शुक्रवार (ता.७) रोजी विद्युत पुरवठा सुरळीत करणा-या महावितरण अधिकारी कर्मचा-यांना अभिनंदनाचे पत्र देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष रेणुसे, किरण राऊत ,उपकार्यकारी अभियंता शैलेश गिते,सहाय्यक अभियंता विठ्ठल भरेकर,संतोष शिंदे,कनिष्ठ अभियंता संदीप सोनार विद्युत कर्मचारी राहुल भुरुक,निलेश शेंडकर,अरुण राऊत,सुनिल राऊत,मोतीराम राऊत,शंकर धिंडले,चंद्रकांत कांबळे,आदी उपस्थित होते.

वेल्हे तालुका दुर्गम असला तरी येथील महावितरणचे कर्मचारी अत्यंत कार्यतत्पर असून यांचे अभिनंदन करणे आवश्यक असल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी आर्वजुन मला अभिनंदनाची पत्रे देण्याच्या सुचना केली आहे, असं प्रविण शिंदे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com