Pune : भाविकांच्या गर्दीमुळे दगडूशेठ गणपती परिसरात कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाविकांच्या गर्दीमुळे दगडूशेठ गणपती परिसरात कोंडी

भाविकांच्या गर्दीमुळे दगडूशेठ गणपती परिसरात कोंडी

पुणे : अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्ताने मंगळवारी सकाळपासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी या भागात मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे शनिवारवाडा आणि दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.कोंडीमुळे इच्छित स्थळी जाण्यास मोठा उशीर होत असल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कोरोनासंबंधीचे नियम शिथिल झाल्यानंतर व भाविकांसाठी मंदिरे खुले झाल्यानंतरची ही पहिलीच अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. त्यामुळे गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रस्ता व बाजीराव रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच दगडूशेठकडे जाणारे इतर मार्ग देखील बंद करण्यात आले आहे किंवा वळविण्यात आले आहे. त्यामुळे पर्यायी रस्त्यांवर देखील कोंडी होत आहे. त्याचा परिमाण म्हणून मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते, मंडई व बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी होत आहे. परिणामी शनिपार चौक, मंडई, तुळशीबाग, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता आणि लक्ष्मी रस्ता परिसरात वाहतूक कोंडी होत आहे.

असा आहे पर्यायी मार्ग :

  1. पूरम चौकातून बाजीराव रस्त्यावर येणाऱ्या वाहनांनी पूरम चौकातून टिळक रस्त्याने टिळक चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता मार्गे पुढे जावे

  2. शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स.गो.बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्त्याने जावे

  3. स.गो.बर्वे चौकातून महापालिका भवनाकडे जाणाऱ्या वाहनांनी स.गो.बर्वे चौकातून, जंगली महाराज रस्त्याने, झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकातून डावीकडे वळून पुढे जावे

  4. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. येणाऱ्या वाहनांनी बाजीराव रस्त्याने सरळ पुढे जावे

loading image
go to top