

Heavy traffic congestion in Pune city as debate over pollution charges gains momentum.
Sakal
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वायुप्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस धोकादायक स्थितीत पोहोचत आहे. यामध्ये वाहनांच्या धुराचा वाटा मोठा आहे. शहरात जास्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर जर ‘दैनिक प्रदूषणशुल्क’ आकारले, तर तब्बल ९६ टक्के वाहनचालक जुनी आणि प्रदूषणकारी वाहने वापरणे बंद करतील, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष ‘द इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्पोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी इंडिया’ (आयटीडीपी) संस्थेने केलेल्या अभ्यासातून समोर आला आहे.