

Congress Alleges Model Code Violation by Ruling Alliance
sakal
पुणे : महायुती सरकारकडून निवडणूक आचारसंहिता आणि नैतिक मूल्यांची सर्रास पायमल्ली होत असून, सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली निवडणूक आयोग निष्क्रिय भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला. आयोगाने सत्ताधाऱ्यांना किमान आचारसंहिता भंगाच्या नोटिसा पाठवून आपली स्वायत्तता सिद्ध करावी, अशी मागणी त्यांनी केली.