काॅंग्रेस म्हणतंय, 'मोदीजी मोराला खायला दाणे द्या पण...'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

"मोराला खायला दाणे द्या, पण शेतकऱ्याला कांदा निर्यात करू द्या', "शेतकरी विरोधी केंद्र सरकारचा निषेध असो', "कांदा निर्यातबंदी उठलीच पाहिजे', अशा घोषणा देत शहर कॉंग्रेसने कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ निदर्शने करीत बुधवारी आंदोलन केले. 

पुणे : "मोराला खायला दाणे द्या, पण शेतकऱ्याला कांदा निर्यात करू द्या', "शेतकरी विरोधी केंद्र सरकारचा निषेध असो', "कांदा निर्यातबंदी उठलीच पाहिजे', अशा घोषणा देत शहर कॉंग्रेसने कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ निदर्शने करीत बुधवारी आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने झाली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेवरून राज्यात सर्वत्र हे आंदोलन झाले. घोषणांच्या निनादात झालेल्या आंदोलनात यावेळी बागवे म्हणाले, "जगभरात लॉकडाऊन असताना मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन केले. कांद्यालाही आता कुठे चांगला भाव येऊ लागल्याने चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्याला होती, पण केंद्र सरकारने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. भारतातील कांद्याला जगभरात मागणी आहे. ती पूरविण्याची भारताची पत आंतरराष्ट्रीय बाजारात आहे. मोदी सरकारच्या निर्णयामुळे पाकिस्तानच्या काद्यांला भाव मिळणार असून स्वत:च्या देशातील बळीराजावर अन्याय होणार आहे.''

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, महापालिकेतील पक्षनेते आबा बागुल, गोपाळ तिवारी यांची भाषणे झाली. यावेळी प्रदेश चिटणीस संजय बालगुडे, माजी आमदार दिप्ती चवधरी, नगरसेवक अरविंद शिंदे, लता राजगुरू, अविनाश बागवे, रजनी त्रिभुवन, संगीता तिवारी, राजेंद्र शिरसाट, विशाल मलके, शिलार रतनगिरी, साहिल केदारी, सचिन आडेकर, रमेश सोनकांबळे, रमेश सकट, सुनिल घाडगे, बाळासाहेब अमराळे, प्रकाश पवार, ×न्थोनी जेकब, संजय कवडे, शंकर ढावरे, बाळासाहेब बाणखेले, सादिक लुकडे, क्‍लेमेंट लाजरस, रॉबर्ट डेव्हिड, मुन्नाभाई शेख, रवि पाटोळे, अनिल आहेर, आबा जगताप, राधिका मखामले, विठ्ठल गायकवाड, सुरेश राठोड, मीरा शिंदे, चेतन आगरवाल, प्रशांत वेलणकर, किशोर वाघेला, सुरेखा खंडागळे, सुजीत यादव, विठ्ठल थोरात, हुसेन शेख, हसन कुरेशी आदींस कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress criticizes Modi government