Vidhan Sabha 2019 : ...तर पंतप्रधानांना जाब विचारायला हवा : शशी थरूर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

''भारताच्या हितासाठी जेव्हा देशाचे पंतप्रधान परदेशात जातात तेव्हा, त्यांना योग्य सन्मान मिळालाच पाहिजे. कारण ते आपल्या देशाचा झेंडा घेऊन बाहेर जात असतात. त्याच बरोबर ते जेव्हा देशात येतात, तेव्हा तुम्ही देशासाठी काय केले याचा जाब देखील विचारायला हवा. विदेशात पंतप्रधान यांचा अपमान केला तर ते मी सहन करु शकत नाही,'' असं स्पष्ट मत काँग्रेसचे खासदार आणि नेते शशी थरुर यांनी मांडले.

विधानसभा 2019 : पुणे : ''भारताच्या हितासाठी जेव्हा देशाचे पंतप्रधान परदेशात जातात तेव्हा, त्यांना योग्य सन्मान मिळालाच पाहिजे. कारण ते आपल्या देशाचा झेंडा घेऊन बाहेर जात असतात. त्याच बरोबर ते जेव्हा देशात येतात, तेव्हा तुम्ही देशासाठी काय केले याचा जाब देखील विचारायला हवा. विदेशात पंतप्रधान यांचा अपमान केला तर ते मी सहन करु शकत नाही,'' असं स्पष्ट मत काँग्रेसचे खासदार आणि नेते शशी थरुर यांनी मांडले. पुण्यात आयोजित राजकीय चर्चा सत्र कार्यक्रमात ते बोलत होते.

विधानसभा 2019 : काँग्रेस पक्ष पूर्ण तयारीनिशी उतरणार
''महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष पूर्ण तयारीनिशी उतरणार आहे. आम्हाला उमेदवारीसाठी कुठलीही अडचण नसून पक्षात खुप जण इच्छुक आहेत.'', असे त्यांनी सांगितले.

370 बाबत पाकिस्तानला बोलण्याचा काही संबंध नाही : थरुर
370 बाबत बोलताना ते म्हणाले की, ''देशाच्या आत चाललेल्या घटनांशी आम्ही सहमत नाही. 370 प्रकरणी जे काश्मिरात केलं ते फार चुकीचं केले आहे. वाईट पद्धतीने आणि भारताच नाव बदनाम करण्यासाठी हा निर्णय घेतला, मात्र यावर पाकिस्तानला यावर बोलण्याचा काही संबंध नाही. एक इंच जमीन सुद्धा पाकिस्तानला देणार नाही, यासाठी आम्ही सरकार सोबत आहोत. मात्र, देशाच्या आतमध्ये आम्ही खुश नाही.

आणखी वाचा : शशी थरूर म्हणतात, पंतप्रधान मोदींचा आदर करायलाच हवा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress leader shashi tharoor statement about pm modi