शशी थरूर म्हणतात, पंतप्रधान मोदींचा आदर करायलाच हवा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 September 2019

पुणे : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी आदर व्यक्त केला पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर थरूर यांनी हिंदू असण्यामागे आपला वैयक्तिक दृष्टीकोन असल्याचे सांगितले आहे.

पुणे : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी आदर व्यक्त केला पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. कायम वेगवेगळ्या माध्यमातून सत्ताधारी भाजपची कोंडी करण्याचा किंवा पंतप्रधान मोदींवर टीका करण्याचा प्रयत्न करणाऱ्या थरूर यांनी मोदींविषयी केलेले हे वक्तव्य उल्लेखनीय मानले जात आहे. त्याचबरोबर थरूर यांनी हिंदू असण्यामागे आपला वैयक्तिक दृष्टीकोन असल्याचे सांगितले आहे.

राष्ट्रवादीचा ‘हा’ निष्ठावंत करणार भाजपमध्ये प्रवेश?

मोदींविषयी काय म्हणाले थरूर?
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाही पद्धतीने निवडून आले आहेत. ते जेव्हा परदेशात जातात तेव्हा भारताचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना आपण देशाचे पंतप्रधान म्हणून आदर आणि सन्मान द्यायलाच हवा,’ असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शशी थरूर यांनी शनिवारी येथे व्यक्त केले आहे. पुण्यातील यशदा येथे सुरू असलेल्या सातव्या ‘पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हल’मध्ये ‘व्हाय आय एम ए हिंदू’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

Vidhan Sabha 2019 : युती तुटली तर ‘ठाणे’ कोणाचे?

म्हणून मी हिंदू आहे : शशी थरूर
हिंदुत्ववादावर थरूर म्हणाले, ‘मी हिंदू असण्यामागे इतरांचा नाही तर, माझा स्वतःचा दृष्टिकोन आहे. या धर्मात व्यक्तीला स्वतःच्या मतानुसार धर्माचे आचरण करता येते हेच वैशिष्टय आहे. अशी संधी कोणताही इतर धर्म देत नाही. उदाहरणार्थ मी रामाला मानतो तर, दुसरी व्यक्ती हनुमान चालीसा पठण करते तर, आम्ही दोघेही हिंदू ठरतो. मात्र, एखादी व्यक्ती ते करत नसेल तरीही, ती हिंदूच ठरते. फक्त धार्मिक नव्हे तर, एकमेकांचे राजकीय विचारही मान्य करणे हेही लोकशाहीच्या दृष्टीने महत्वाचे आहे.’

शिवसेनेला शह देत भाजप मुंबई जिंकणार?

देशात दोन टोकाचे गट : थरूर
थरूर म्हणाले, ‘सध्या राजकारण हे राज्यकर्त्यांची आवड आणि कृती यात विभागले आहे. याचाच परिणाम म्हणून भारतात दोन टोकाचे गट निर्माण झाले आहेत. त्यांच्यात सहिष्णुतेचा अभाव आहे. राजकारणात येण्यापूर्वी माझ्याभोवती असणारे सुरक्षेचे कवच अचानक नाहीसे झाले आणि मी काही लोकांकडून लक्ष्य झालो. आजही सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर ट्रोलर्स आहेत. सोशल मीडियावरून टीका करणारे माफिया मला खुनी म्हणतात.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress leader shashi tharoor statement about being hindu and pm modi pilf