
खडकवासला : ‘‘मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्राणपणाला लावले, याच मावळ्यांच्या शक्तीने इतिहास बदलला अन् स्वराज्य स्थापन झाले. अशा प्रकारे खांद्याला खांदा देऊन एकजुटीने लढा, पक्षातील उणिवा, अडचणींवर मात करून विरोधकांना हरविण्याची वेळ आली आहे,’’ असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.