

Maharashtra Congress Politics Harshwardhan Sapkal Says Many Leaders Are Ready to Join Congress Amid Statewide Organisational Expansion
sakal
पुणे: ‘‘काँग्रेसचा राज्यभर संघटनात्मक विस्तार सुरू आहे. यापुढे काँग्रेसचे महाराष्ट्र हेच लक्ष्य असून, पक्षात येणाऱ्यांची यादीही मोठी आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश होतील. मात्र पक्षात कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही, हे पक्षाचे नेते निश्चित करतील’’, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी केले.