Congress Manifesto : काँग्रेसचा जाहीरनामा भयानक केशव उपाध्ये यांची टीका

मोदी सरकारने गेल्या १० वर्षात केलेल्या कामाच्या जोरावरच आम्ही निवडणूक लढवत आहोत. पण काँग्रेसच्या जाहीरनाम्यात भयानक आश्वासने दिली आहेत.
Congress Manifesto Terrible Keshav Upadhyay Criticism lok sabha political
Congress Manifesto Terrible Keshav Upadhyay Criticism lok sabha politicalSakal

Pune News : मोदी सरकारने गेल्या १० वर्षात केलेल्या कामाच्या जोरावरच आम्ही निवडणूक लढवत आहोत. पण काँग्रेसच्या जाहीरनाम्यात भयानक आश्वासने दिली आहेत. त्यामुळे आम्हाला त्यावर बोलावे लागत आहे.

आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून वाढवली जाईल असे राहुल गांधी सांगत असले तरी ते अनुसूचित जाती, जमातीचे आरक्षण बदलणार नाहीत याची ठोस भूमिका मांडत नाहीत अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते. राष्ट्रीय समजा पक्षाचे शहराध्यक्ष बालाजी पवार, रिपाइं जोगेंद्र कवाडे गटाचे शहराध्यक्ष प्रकाश भालेराव, माजी नगरसेवक महेश वाबळे, महायुती समन्वयक संदीप खर्डेकर, पुष्कर तुळजापूरकर, अमोल कवीटकर आदी यावेळी उपस्थित होते.

केशव उपाध्ये म्हणाले, राहुल गांधी यांची पुण्यात सभा झाली, त्या सभेला किती गर्दी होती, खुर्च्या रिकाम्या होत्या की भरलेल्या होत्या या वादात मला पडायचे नाही. त्यांनी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यावरून वाढवून ७३ टक्क्यांपर्यंत नेणार असल्याचे सांगितले,

पण त्याच वेळी ते अनुसूचित जाती, जमातीचे आरक्षण कायम राहील याबाबत काहीच भूमिका मांडली नाही. कर्नाटकात काँग्रेसने ओबीसीचे आरक्षण काढून अन्य धर्मीयांना देण्याचे पाप केले आहे आणि वरून आरक्षणाची मर्यादा वाढवू असे म्हणत आहेत.

भाजप स्वःच्या मुद्द्यांऐवजी काँग्रेसच्या मुद्द्यांवर प्रचार का करत आहे असे विचारले असता उपाध्ये म्हणाले, ‘‘मोदी सरकारने १० वर्षात जी कामे केली त्यावर आम्ही प्रचार करत होतो. पण काँग्रेसचा जाहीरनामा आल्यानंतर त्यात ३७० कलम पुन्हा लागू करणार, तीन तलाक पुन्हा आणणार यासह अन्य भयंकर मुद्दे यामध्ये आहेत.

त्यामुळे त्यावर आम्हाला बोलावे लागेल. काँग्रेसने कर्नाटकात योजनांची घोषणा केली. त्यावर तेथील अर्थमंत्र्याने आता आमच्याकडे विकासासाठी पैसे शिल्लक नाहीत असे सांगितले. म्हणजेच काँग्रेसची कथनी आणि करनी यात फरक आहे.

इंदिरा गांधींनी गरीब हटावचा नारा देऊन निवडणूक लढवली पण त्यांनी गरीबी कधीच हटविली नाही. मोदी सरकारने अनेक रोजगार उपलब्ध केले असून, दर महिन्याला नवीन १२ लाख पीएफचे खाते निघत आहेत, त्यामुळे या विषयावर काँग्रेसला बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका उपाध्ये यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com