PMC Election: पुण्यात मविआत बिघाडी? मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसचे 'एकला चलो रे' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress

पुण्यात मविआत बिघाडी? मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसचे 'एकला चलो रे'

पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस भवन येथे ही बैठक आज पार पडली असून पुणे महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवावी अशी सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मागणी केली होती.

दरम्यान, येणाऱ्या महापालिका निवडणुकासाठी सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत असून आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कोअर कमिटीची बैठक पार पडली. कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये पुणे महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याची मागणी केली होती.

कार्यकर्त्यांच्या तसेच सर्व नेतेमंडळींच्या आग्रही मागणीमुळे येणारी पुणे महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली. त्याबरोबर निवडणुकीसाठी इच्छुकांनी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात प्रभागाची व पक्ष संघटनेची बांधणी करण्यास सुरूवात करावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मविआत बिघाडी?

काँग्रेसने मनपा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. पण काँग्रेसच्या निर्णयानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका काय असणार आहे याकडे लक्ष असणार आहे.

Web Title: Congress No Alliance Any Party In Pmc Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..