कॉंग्रेसच्या 'या' नेत्याला विधान परिषदेवर घ्या; कार्यकर्त्यांची मागणी!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

कॉंग्रेसच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी भन्साळी यांनी तब्बल अकरा वर्षे सांभाळली आहे.

पुणे : कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी  मागणी पुणे जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

या नियुक्तीमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये आणि समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल, असे मतही कार्यकर्त्यांनी ही मागणी करताना व्यक्त केले. 

- अंत्यविधीसाठी करू नका धावपळ; 'मोक्ष सेवा' मिळणार एका कॉलवर!

भन्साळी यांनी आजपर्यंत पक्षासाठी आपले तन-मन-धन लावून पक्षाची सेवा केली आहे. ते पक्षात एक सर्वसामान्य कार्यकर्तां म्हणून दाखल झाले होते. तेव्हापासून त्यांनी पक्षाने सोपविलेली प्रत्येक जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडली आहे. त्यामुळे पक्षाने भन्साळी यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या एकनिष्ठ कार्यकत्यांची कदर करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडे करण्यात आली आहे.

- मागासवर्गीय, आदिवासी शेतकऱ्यांना 'या'साठी मिळणार अडीच लाखाचे अनुदान!

कॉंग्रेसच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी भन्साळी यांनी तब्बल अकरा वर्षे सांभाळली आहे. कॉंग्रेस पक्ष अडचणीत असताना अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत, असेही कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा - दरमहा 10 हजार स्टायपेंड अन् मोफत प्रशिक्षणही; तरुणांसाठी आहे रोजगाराची संधी!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress party workers demanded that Congress leader Devidas Bhansali be given a chance to Legislative Council