
खडकवासला : ‘‘काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले आहेत. त्यावर उत्तर देण्याचे काम आयोगाचे आहे. मात्र, आयोगाने उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया देत असतील, तर त्यांना हा अधिकार कोणी दिला,’’ असा सवाल काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मंगळवारी उपस्थित केला. फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त, अशी टीकाही त्यांनी केली.