फोन टॉपिंग म्हणजे मुलभूत तत्वांवर घाला घालण्याचे काम : थोरात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 January 2020

केंद्रातील सरकारकडून मुलभूत तत्वांवर घाला घालण्याचे काम सुरु आहे. फोन टॉपिंग हा त्यातलाच एक प्रकार आहे. अशा प्रकरच्या कारभारमुळे लोकशाही धोक्यात आली आहे, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर नाव न घेता टीका केली.

पुणे : केंद्रातील सरकारकडून मुलभूत तत्वांवर घाला घालण्याचे काम सुरु आहे. फोन टॉपिंग हा त्यातलाच एक प्रकार आहे. अशा प्रकरच्या कारभारमुळे लोकशाही धोक्यात आली आहे, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर नाव न घेता टीका केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य फोन टॉपिंगचे प्रकरण गाजते आहे. आज पुण्यात एका कार्यक्रमासाठी थोरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. ते म्हणाले, ' केंद्रातील सरकारचे गेल्या पाच वर्षातील काम पाहिले, तर लोकशाहीवर घाला घालण्याचे काम सुरु आहे. त्याचाच हा एक भाग आहे. लोकशाही मानणारे आणि जपणारे आपण सर्वंजण आहेत. व्यतिगत स्वतंत्र संकुचित करण्याचे काम सुरु आहे. यावरून लोकशाही धोक्यात येईल का अशी भिती वाटते आहे.

INDvsNZ:श्रेयस अय्यरनं विश्वास सार्थ ठरवला; टीम इंडियाचा दणदणीत विजय

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची सुरक्षा काढून घेण्यावरून थोरात म्हणाले, पवार हे देश पातळीवरील नेते आहेत. त्यांना जपणे हे सरकारचे काम आहे. अशा प्रकारे त्यांची सुरक्षा काढून घेणे योग्य नाही. राज ठाकरे यांच्या बदल बोलताना थोरात म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ठाकरे यांनी जी भाषणे केली. ती लोकशाही बळकट करणारी होती. त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे. राजकारणात सर्वांना बरोबर घेऊन चालले पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress state president balasaheb thorat speak about Phone Tapping