
पुणे - पुणे शहरातील प्रलंबित योजना व विकास कामांसाठी मोठी प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. हा निधी न मिळाल्याने शहराचा विकास खुंटत आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात केंद्र व राज्य सरकारने पुण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.