पुणे जिल्ह्यात काँग्रेस स्वबळावर लढणार : नाना पटोले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे जिल्ह्यात काँग्रेस स्वबळावर लढणार : नाना पटोले

पुणे जिल्ह्यात काँग्रेस स्वबळावर लढणार : नाना पटोले

वेल्हे, (पुणे) : पुणे जिल्ह्यात आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार असून यासाठी काँग्रेसची तयारी सुरू झाली असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

वेल्हे येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन वेल्हे काँग्रेसच्या वतीने आज (ता.२५) रोजी वेल्हे येथील मेंगाईदेवी मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी भोर विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे , जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार संजय जगताप, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे उपाध्यक्ष देविदास भन्साळी, राजगडच्या संचालिका शोभाताई जाधव,

श्रीरंग चव्हाण , वेल्हेचे सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, कुरण विंझर गटाचे जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे , राजगडचे संचालक व वेल्हे चे सरपंच संदीप नागिने ,पंचायत समिती सदस्य सीमा राऊत,माजी जिल्हा परिषद सदस्य वसुधा नलावडे महिला अध्यक्ष आशा रेणुसे ,माजी सभापती सविता वाडघरे, तालुकाध्यक्ष नाना राऊत,काँग्रेसचे युवक अध्यक्ष शिवराज शेंडकर,उपाध्यक्ष गणेश जागडे, वांगणीचे उपसरपंच शिवाजी चोरगे, मार्गसनीचे माजी सरपंच विशाल वालगुडे, राहुल मराठे ,राजकुमार अलगुडे, आदीसह तालुक्‍यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा: वानखेडे कुटुंबियांविरोधातील नवाब मलिकांच्या आरोपांना लागणार ब्रेक!

यावेळी पटोले म्हणाले, काँग्रेस जनसामान्यांचा पक्ष असून काँग्रेसचा खरा शत्रू भाजप असून देशातील महागाईसाठी भाजप पक्ष जबाबदार आहे घरगुती गॅसच्या किंमती वाढवून गरिबांचे रॉकेल बंद करून जनतेचे रेशनसुद्धा काही दिवसांनी बंद होईल. तर महाविकास आघाडी सरकार पडण्याची स्वप्न काही जणांना दिवसाही पडायला लागली आहे . महाविकास आघाडी पाच वर्षे कार्यकाल पूर्ण करेल अशी खात्री असल्याचे पटोले म्हणाले.

आमदार संग्राम थोपटे म्हणाले, काही दिवसांपूर्वी भोर येथील कार्यक्रमात माझ्या शिक्षणावर व वयक्तिक टीका करण्यात आली आमच्या संस्कृतीचा भाग म्हणून शांत राहतो नाहीतर आम्हीही यापुढे भीडभाड ठेवणार नाही .आमदार संजय जगताप म्हणाले,पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकत वाढविण्यासाठी आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपदाची संधी द्यावी अशी मागणी याप्रसंगी जगताप यांनी केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेल्हे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नाना राऊत यांनी केले प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे केले तर आभार युवक अध्यक्ष शिवराज शेंडकर यांनी मानले.

loading image
go to top