
कात्रज : पुण्याच्या गिर्यारोहकांनी हिमाचल प्रदेशातील ६ हजार १११ मीटर उंचीच्या माउंट युनम या हिमशिखरावर यशस्वीपणे तिरंगा फडकवत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. अॅडव्हेंचर जंक्शन या संस्थेच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली होती. देशभरातून आलेल्या २२ अनुभवी गिर्यारोहकांपैकी सात जणांनी हे आव्हान पूर्ण करत शिखरमाथ्यावर पाय ठेवला.