धनकवडी - सह्याद्रीच्या खोर्यात चढाईसाठी अत्यंत कठीण श्रेणीत गणला जाणारा मोरोशीचा भैरवगड (फ्रंट वॉल) पुण्यातील एडव्हेंचर जंक्शनच्या गिर्यारोहकांनी सर करून भगव्या धव्जासह छत्रपती शिवरायांना अभिवादन केले.माळशेज घाट उतरल्यावर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील मोरोशी गावच्या दक्षिणेस भैरावगडाची अजस्त्र भिंत दिसते. भूगार्भाच्या परिभाषेत अशा भिंतीना डाईक असे संबोधतात.