अकरावीच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी ७ हजार विद्यार्थ्यांची सहमती

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 December 2020

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या नियमित गुणवत्ता यादीत निवड झालेल्या सुमारे सात हजार ५५८ विद्यार्थ्यांनी (३२.६९ टक्के ) प्रवेशासाठी संमती दर्शविली आहे. त्यातील सुमारे पाच हजार ३४२ विद्यार्थ्यांनी प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे.

पुणे - अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या नियमित गुणवत्ता यादीत निवड झालेल्या सुमारे सात हजार ५५८ विद्यार्थ्यांनी (३२.६९ टक्के ) प्रवेशासाठी संमती दर्शविली आहे. त्यातील सुमारे पाच हजार ३४२ विद्यार्थ्यांनी प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीमार्फत प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. 

कोरोनाचा संसर्ग तरुणाईला सर्वाधिक

या अंतर्गत दुसरी नियमित गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. या फेरीसाठी जवळपास ४६ हजार ७९४ विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यातील २३ हजार १२० विद्यार्थ्यांची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली. त्यातील सात हजार ५५८ विद्यार्थ्यांनी ‘कन्सर्न गिवेन’ची प्रक्रिया केली आहे. तर पाच हजार ३४२ विद्यार्थ्यांनी प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र गुणवत्ता यादी जाहीर होऊन तीन दिवस उलटले, तरी देखील गुणवत्ता यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १५ हजार ५६२ विद्यार्थ्यांनी अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. 

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा फी वाढीबाबत पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय!

दुसऱ्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ४४८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला असल्याची माहिती केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी दिली आहे.

विद्यार्थी-पालकांसाठी सूचना... 

  • दुसऱ्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लॉगिंनमध्ये जाऊन प्रोसिड फॉर ॲडमिशन करायचे आहे.
  • विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश निश्‍चित करणे
  • पहिला पसंतीक्रम मिळाला असल्यास विद्यार्थ्यांना त्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे.
  • पहिला पसंतीक्रम मिळूनही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही अथवा नाकारला तर अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेऱ्यांमध्ये संधी दिली जाणार नाही. त्यांना केवळ विशेष फेरीमध्ये संधी मिळू शकेल.
  • विद्यार्थ्यांनी घेतलेला प्रवेश रद्द करायचा असल्यास संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात विनंती करावी आणि आपला प्रवेश रद्द करून घ्यावा.
  • घेतलेला प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील नियमित फेऱ्यांसाठी प्रतिबंधित करण्यात येतील, अशा विद्यार्थ्यांना विशेष फेरीपर्यंत थांबावे लागेल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Consent of 7000 students admission second round Eleventh