स्थिर इंधन दरामुळे वाहनचालकांना दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Petrol

अनलॉक सुरू झाल्यानंतर सततच्या दरवाढीला वैतागलेल्या वाहनचालकांना मागील चार महिन्यांपासून मोठा दिलासा मिळाला आहे.

स्थिर इंधन दरामुळे वाहनचालकांना दिलासा

पुणे - अनलॉक (Unlock) सुरू झाल्यानंतर सततच्या दरवाढीला (Rate Increase) वैतागलेल्या वाहनचालकांना (Vehicle Driver) मागील चार महिन्यांपासून मोठा दिलासा (Comfort) मिळाला आहे. गेल्या ४ नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol Diesel Rate) एकदाही वाढलेल्या नाहीत. देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढे दिवस पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

शहरात मार्च २०२० मध्ये पेट्रोलचे दर ७७.१५, तर डिझेल ६४ रुपये प्रति लिटर होते. तसेच सीएनजी गॅस ५५ रुपये प्रतिकिलो होता. त्यानंतर अनलॉक सुरू होण्यापर्यंत इंधनाच्या दरात मोठे बदल झाले. मात्र, अनलॉकनंतर सातत्याने इंधनांच्या किमती वाढत जाऊन सध्या शहरात पेट्रोल १०९.५०, तर डिझेल ९२.५० रुपये प्रतिलिटर झाले आहे. तर सीएनजीचा दर ६६ रुपये प्रतिकिलो आहे. पेट्रोल पाच रुपयांनी आणि डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर वाहनचालकांना दिवाळी गिफ्ट मिळाले होते. त्यानंतर दरवाढीचा दिलासा अद्याप कायम आहे.

सीएनजी ११ रुपयांनी महागला

गेल्या दीड वर्षांत सीएनजी गॅसच्या दरात प्रतिकिलो ११ रुपयांनी वाढली झाली आहे. गेल्या १ जुलै रोजी ५४.८० रुपये असलेले सीएनजी, आता ६६ रुपये किलो झाला आहे. स्थानिक गॅसचे दर आता एप्रिलमध्ये निश्चित होणार आहे. त्यात सीएनजीची किमती नवीन दराबाबत निर्णय होईल.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात मंगळवारी २३९ नवीन कोरोना रुग्ण; एकही मृत्यू नाही

पुणे जिल्ह्यात मंगळवारी २३९ नवीन कोरोना रुग्ण; एकही मृत्यू नाहीगेल्या काही महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दिवाळीत दर कमी झाल्यानंतर चार महिने हा दिलासा मिळत आहे. मात्र भविष्यात पुन्हा दरवाढीचा भडका होऊ नये. रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे पुन्हा दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- गणेश सराईकर, लघु व्यावसायिक

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर ८० डॉलर बॅरलपर्यंत खाली आले होते. त्यामुळे गेल्या चार महिनांत दरवाढ झाली नाही. आता ते ९४ डॉलरवर गेले असले, तरी ही वाढ खूप जास्त नाही. त्यामुळे इंधन दरवाढीचा भडका होणार नाही. सध्या आपल्याकडे इंधनाचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे इंधनाचे दर अचानक मोठ्या प्रमाणात वाढणार नाही.

- अली दारूवाला, प्रवक्ते, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन

Web Title: Consolidation Of Motorists Due To Stable Fuel Rates

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneFuel Rate