esakal | बारामतीत बांधकाम व्यावसायिकांचे आंदोलन स्थगित
sakal

बोलून बातमी शोधा

Baramati-Corporation

बारामती शहरातील नगरपालिका हद्दीतील बांधकाम परवानगीबाबत बांधकाम व्यावसायिक व प्रशासनात आज बैठक झाली. या बैठकीनंतर शुक्रवारी (ता. 6) व्यावसायिकांकडून केले जाणारे आत्मचिंतन आंदोलन तूर्त मागे घेत असल्याचे क्रेडाईच्या वतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे सांगितले गेले.

बारामतीत बांधकाम व्यावसायिकांचे आंदोलन स्थगित

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती - शहरातील नगरपालिका हद्दीतील बांधकाम परवानगीबाबत बांधकाम व्यावसायिक व प्रशासनात आज बैठक झाली. या बैठकीनंतर शुक्रवारी (ता. 6) व्यावसायिकांकडून केले जाणारे आत्मचिंतन आंदोलन तूर्त मागे घेत असल्याचे क्रेडाईच्या वतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे सांगितले गेले. 

आज नगरपालिकेत झालेल्या बैठकीस नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, मुख्याधिकारी किरणराज यादव यांच्यासह सुरेंद्र भोईटे, राहुल खाटमोडे, प्रफुल्ल तावरे, दीपक काटे, चंद्रकांत शिंगाडे, प्रताप चव्हाण आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या बैठकीत प्रलंबित सर्व प्रकरणे सकारात्मक भूमिका घेत येत्या आठ ते दहा दिवसात निकाली काढण्याचे आश्वासन मुख्याधिका-यांनी दिल्यानंतर सामंजस्याच्या भूमिकेतून क्रेडाईने आत्मचिंतन आंदोलन स्थगित केले. 

'आज तुझी विकेट टाकतो' म्हणत टोळक्याचा तरूणावर प्राणघातक हल्ला 

अनेक सुरस कहाण्या आल्या समोर...
बांधकाम व्यावसायिकांना नगररचना विभागातील ठराविक दोन तीन कर्मचा-यांनी ज्या पध्दतीने छळले, त्याच्या अनेक कहाण्या या निमित्ताने समोर आल्या. कशा पध्दतीने टाळाटाळ करायची, मुद्दाम वेळकाढू पणा करायचा, जेणेकरुन बांधकाम व्यावसायिकांनी वेगळे मार्ग स्विकारुन काम करुन घेण्यास संमती द्यावी, कायद्यातील एखादी तरतूद सांगताना वरिष्ठ अधिका-याचे नाव घेतल्यास त्याच्याकडून परवानगी घ्या अशी उध्दट तर काही वेळा साहेबांना भेटून का घेत नाही अशी सूचक भाषा वापरायची. स्वताःच्या मर्जीप्रमाणे जर घडत नसेल तर परवानगी द्यायचीच नाही असा जणू चंगच या दोन तीन बहाद्दरांनी बांधल्याचे अनेक किस्से गेल्या दोन दिवसात चर्चिले गेले. एका वरिष्ठ अधिका-याने ज्या दिवशी बदली झाली त्या दिवशी एका फाईलवर सही करण्यासाठी कशी अडेलतट्टूपणाची भूमिका घेतली व शेवटी मनाजोगते काम न झाल्याने त्याने सही केलीच नाही, याचीही चर्चा झाली. 

....म्हणुन 7 जिल्ह्यातील बँकांचे 1 हजार कोटींचं थकीत कर्जांची वसुली थांबली

व्यवसाय करणे हा गुन्हा आहे का....
बारामतीत बांधकाम व्यावसायिकांना परवानगी घेताना जो द्रविडी प्राणायम करावा लागतो, जी दिरंगाई होते, त्याने सर्वच व्यावसायिक हैराण आहेत. दोन चार जणांच्या हट्टासाठी सर्वच बांधकाम क्षेत्राला होणारा मनस्ताप हा गंभीर विषय असून सर्वांची खोलात जाऊन चौकशी गरजेची आहे. काही अनिष्ट प्रथा पार पाडल्याशिवाय काम होणे अशक्य असल्याची भावना तयार झाल्याची बांधकाम व्यावसायिकांची तक्रार आहे. नाव प्रसिध्द होऊ नये या अटीवरच ते बोलतात इतकी भीती त्यांना या यंत्रणेची वाटू लागली आहे.

Edited By - Prashant Patil