'आज तुझी विकेट टाकतो' म्हणत टोळक्याचा तरूणावर प्राणघातक हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

फिर्यादी हे बुधवारी (ता.4) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास भारतनगर येथील ब्रीजखाली मटन मार्केट जवळ नाष्टा करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. आरोपी अमर फिर्यादी कदम यांना म्हणाला, "तुला माज आला आहे का? तू जय व बबलू भाईला खुन्नस देतो काय. आज तुझी विकेट टाकतो'.

पिंपरी : "तू जय व बबलू भाईला खुन्नस देतो काय, आज तुझी विकेट टाकतो' असे म्हणत सहा जणांच्या टोळक्‍याने तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना पिंपरीतील भारतनगर येथे घडली. 

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

मतीश अकबर कुरेशी (वय 24), ओमकार मारुती कामत (वय 18) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह अनिश फिरोज शेख (वय 18), अमर सुरेश ओंबासे (वय 18), जय दिलीप बिरजे, बबलू दिलीप बिरजे (सर्व रा. भारतनगर, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सनी सुरेश कदम (वय 24, रा. भारतनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.

पाणी प्रदूषण रोखायचंय? तर तुम्हाला पुणे विद्यापीठ देणार ट्रेनिंग 
 

फिर्यादी हे बुधवारी (ता.4) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास भारतनगर येथील ब्रीजखाली मटन मार्केट जवळ नाष्टा करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. आरोपी अमर फिर्यादी कदम यांना म्हणाला, "तुला माज आला आहे का? तू जय व बबलू भाईला खुन्नस देतो काय. आज तुझी विकेट टाकतो'. दरम्यान अनिश याने कदम यांच्या पाठीवर कोयत्याने वार केला.

माजी खासदार संजय काकडे यांना पत्नीसह अटक व सुटका

कदम मटणाच्या दुकानाकडे पळत असताना आरोपींनी त्यांना खाली पाडून कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले. खुनी हल्ला केल्यानंतर "जय बिरजे आणि बबलू बिरजे यांच्या नादी लागू नकोस. तुला आज जिवंत सोडत नाही', अशी जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी पसार झाले. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The gang attacked the boy in Bharat nagar Pimpri Pune