Pune News : बांधकाम विभागाकडून २ हजार ६०० कोटी रुपयांचा महसुल गोळा

मिळकत करापोटी महापालिकेच्या तिजोरीत २ हजार ३५५ कोटी रुपये जमा.
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation Sakal
Updated on

पुणे - महापालिकेच्या उत्पन्नाचा कणा समजल्या जाणाऱ्या बांधकाम विभागाने २ हजार ६०० कोटी रुपये, तर मिळकत कर विभागाने २ हजार ३५५ कोटी रुपये इतक्‍या महसुलाची महापालिकेच्या तिजोरीत भर घातली. मिळकतकर विभागाला अंदाजपत्रकानुसार उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठता आले नसले, तरीही मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात मिळकत कर विभागाने १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त अधिक महसुल मिळविला आहे.

महापालिकेच्या मिळकत कर, बांधकाम विभागासह विविध विभागांकडून महसुल वाढीला प्राधान्य देण्यात आले होते. मिळकत कर विभागाकडून अधिकाधिक मिळकत कर जमा होण्यासाठी विशेष पथके, महिलांची पथके, बॅंड पथके अशा विविध पथके तयार केली होती. विशेषतः शेवटच्या टप्प्यात तांत्रिक अडचणी असलेल्या अनेक प्रकरणांवर तातडीने निर्णय घेत नागरिकांना मिळकत कर भरण्यास प्रोत्साहन देण्यात आले होते.

दरम्यान, मागील वर्षीप्रमाणे यंदाही सलग सुट्या आल्याने नागरिकांची गडबड होण्याची शक्‍यता होती. मात्र, महापालिकेने २८ ते ३१ मार्च या सार्वजनिक सुट्टीच्या कालावधीत ग्राहक सुविधा केंद्र सुरू ठेवली होती. याबरोबरच कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देत, त्यास तांत्रिक अडचण येऊ नये, याची खबरदारी विभागाने घेतली होती.

मिळकत कर विभागाकडून ३१ मार्च रोजी ३१ कोटी ८९ लाख ८५ हजार ३२६ रुपये, तर १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षात २ हजार ३५५ कोटी ९ लाख ४ हजार ३३९ रुपये इतका महसूल प्राप्त केला. मागील वर्षी ३१ मार्च २०२४ रोजी एका दिवसात २२ कोटी ९२ लाख ६० हजार ४४७ रुपये, तर १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षात २ हजार २४९ कोटी ९९ लाख ८६ हजार ६०७ रुपये इतका मिळकतकर जमा केला होता.

त्यानुसार, मागील वर्षीच्या तुलनेत मिळकत कर विभागाने १०० कोटींपेक्षा जास्त मिळकत कर जमा केला आहे. मात्र, अंदाजपत्रकानुसारचे २ हजार ७०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट विभागाला गाठता आलेले नाही. राज्य शासनाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर समाविष्ट गावांतील थकबाकीदारांवर कारवाई करू नये, असे आदेश दिल्याने उत्पन्न कमी झाल्याचा दावा मिळकत कर विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

बांधकाम विभागाने दिले २६०० कोटी रुपये

बांधकाम विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात ३ हजार ३५९ बांधकामांना परवानगी दिली. त्यातून बांधकाम विभागाने २ हजार ४९२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट पार करत २ हजार ६०१ कोटी ८८ लाख रुपयांचा महसुल मिळविला. मागील वर्षी देखील बांधकाम विभागाने महसुलाचे उद्दिष्ट पार करत २ हजार ४०७ कोटी रुपये इतका महसुल प्राप्त केला होता.

'देशामध्ये पुणे शहरात शिक्षण, रोजगार व निवासासाठी चांगले वातावरण आहे. आयटी कंपन्यांसह विविध कंपन्यांमुळे नोकऱ्यांसाठी पुणे शहराकडे येण्याचा ओघ वाढला आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने पुण्याचा विकास होत आहे. त्यामुळे पुण्यातील राहणीमानाचा दर्जा सुधारत आहे. त्यामुळे शहरात निवासी आणि व्यापारी संकुलांमध्ये वाढ झाली आहे. बांधकाम परवानगीची यंत्रणा सुटसुटीत असल्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे घरांची मागणी वाढत आहे.'

- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका.

मिळकत कर व बांधकाम विभाग कराची आकडेवारी

एका दिवसात जमा झालेला मिळकत कर

३१ मार्च २०२४ - २२ कोटी ९२ लाख ६० हजार ४४७

३१ मार्च २०२५ - ३१ कोटी ८९ लाख ८५ हजार ३२६ (सायंकाळी ६ पर्यंत)

आर्थिक वर्षातील जमा झालेला मिळकत कर

१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ - २ हजार २४९ कोटी ९९ लाख ८६ हजार ६०७

१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ - २ हजार ३५५ कोटी ९ लाख ४ हजार ३३९ ( सायंकाळी 6 पर्यंत)

बांधकाम विभाग

आर्थिक वर्ष ठेवण्यात आलेले उद्दीष्ट (कोटीमध्ये) प्रत्यक्ष उत्पन्न (कोटीमध्ये)

२०१९-२० ८९९ कोटी ६७ लाख ७६९ कोटी ६३ लाख

२०२०-२१ ९९९ कोटी ३३ लाख ५०७ कोटी ६३ लाख

२०२१-२२ १ हजार १८५ कोटी ६ लाख २ हजार ९५ कोटी ९ लाख

२०२२-२३ १ हजार ४०० कोटी १५ लाख १ हजार ६३५ कोटी ९४ लाख

२०२३-२४ १ हजार ६०४ कोटी ८४ लाख २ हजार ४०७ कोटी २६लाख

२०२४-२५ २ हजार ४९२ कोटी ८४ लाख २ हजार ६०१ कोटी ८८ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com