सतीश मगर यांच्या मते, या सवलती दिल्यास बांधकाम क्षेत्राला उभारी 

satish magar
satish magar
Updated on

पुणे : बांधकाम क्षेत्रावर 122 लहान मोठे उद्योग अवलंबून असून त्यातून पाच कोटी नागरिकांना रोजगार मिळतो. हे क्षेत्र सध्या ठप्प पडले आहे. ते पुन्हा सुरू करून टिकवून ठेवायचे असेल, तर या क्षेत्राला राज्य आणि केंद्र सरकारकडून काही सवलती द्याव्या लागतील. त्याचबरोबर ग्राहकांना घरे खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी चालना द्यावी लागेल,'' अशी अपेक्षा क्रेडाई इंडियाचे अध्यक्ष सतीश मगर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. "या क्षेत्राला पुन्हा उभारी घेण्यास किमान सहा ते आठ महिन्यांचा अवधी लागेल, पण हा काळ या क्षेत्रासाठी संधीचा काळ असणार आहे,' असेही त्यांनी नमूद केले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात लॉकडाउन सुरू आहे. कोविड-19 च्या नंतर भविष्यात या क्षेत्रात काय घडामोडी घडतील, यावर मगर यांनी मार्गदर्शन केले. देशात सर्वाधिक रोजगार देणाऱ्या क्षेत्रात बांधकाम व्यवसाय मोडतो. परंतु गेल्या वर्ष ते दोन वर्ष या व्यवसायात मरगळ आली होती. त्यात कोविड-19 मुळे आणखी भर पडली. त्यामुळे या व्यवसायाचे भवितव्य काय राहील, असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मगर यांनी सविस्तर विवेचन केले.

मगर म्हणाले, ""बांधकाम व्यवसायावर किमान पाच कोटी कामगार अवलंबून आहेत. देशातील रोजगार देणारी ही मोठी इंडस्ट्री आहे. तीन मे रोजी लॉकडाउन पूर्ण उठेल आणि सर्व सुरळीतपणे सुरू होईल, असे गृहीत धरले तरी हा व्यवसाय सुरू होण्यास किमान सहा ते आठ महिने लागतील. कारण या क्षेत्रापुढे सध्या मजूर, वित्त पुरवठा आणि सुरळीत साहित्य पुरवठा या तीन प्रमुख अडचणी असणार आहे. स्थलांतरित मजूर पुन्हा कामावर येणे आणि प्रकल्प सुरू करण्यासाठी लागणारा पैसा कसा उभा करावयाचा या दोन गोष्टी महत्त्वाच्या राहणार आहेत. बॅंकांनी कर्जावर तीन महिन्यांची सवलत दिली आहे. परंतु तीन महिन्यात हे सर्व सुरळीत होईल, असे वाटत नाही. सुरळीत करण्यासाठी बॅंकांना थोडा काळ अधिक वाढवून द्यावा लागेल. कर्जाचा पुरवठाचे दीर्घकाळासाठी  फेरनियोजन करावे लागेल. ग्राहकांना घर खरेदीसाठी कसे प्रोत्साहित देता येईल, त्यासाठी विविध योजना आणि सवलती द्याव्या लागतील.''

 आगामी काळ सुवर्णकाळ
कोविड 19 नंतर या व्यवसायाला सुवर्णकाळ येईल, असे वाटते. कारण ज्यांना स्वतः:ची घरे नाहीत, जे भाड्याने राहतात. त्यांना स्वतः:च्या घर हवे, याचे महत्त्व पटले आहे. परदेशात स्थायिक झालेले भारतीय ग्राहकही पुन्हा एकदा गुंतवणूक म्हणून आकर्षित होतील. हा ग्राहक मध्यंतरी थांबला होता. तो पुन्हा या निमित्ताने सुरू होईल. सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व सर्वांनाच कळाले आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांकडूनही जागेची मागणी वाढले. आज जरी "वर्क फ्रॉम होम'ला प्राधान्य देणार असल्याचे कंपन्या म्हणत असल्या तरी ते कल्चर आपल्याकडे नाही. अन्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे विमा, बॅंकिंग, माहिती-तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रात परदेशी गुंतवणूक वाढेल. त्यातून घरांची मागणीही वाढेल, असा अंदाज आहे. मात्र, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. खर्च कमी करावा लागेल. स्थानिक कामगार वर्ग तयार करावा लागेल, हे या आगामी काळातील आव्हाने असणार आहेत.''

घरांच्या किमती स्थिर राहतील
घरांच्या किमती फार कमी होतील, असे वाटत नाही. कारण किमतीत  बांधकामाचा खर्च, विविध प्रकाराचे कर व जागेची किंमत समाविष्ट असते. त्यामुळे ते शक्‍य नाही. रेडीरेकनरमधील दराच्या खाली घरांची विक्री करता येत नाही. हे सर्व पाहिले तर किमती वाढणार नाहीत. परंतु स्थिर राहतील. या व्यवसायातून बाहेर पडून अन्य क्षेत्रातील व्यवसायाकडे बांधकाम व्यावसायिक वळतील, हे ही तितके शक्‍य वाटत नाही.''

पर्यटनाला चालना देणे आवश्‍यक
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशी पर्यटनाला चालना मिळू शकते. त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे. पुढील दोन ते तीन वर्ष नागरिक परदेश प्रवास टाळतील, असे वाटते. त्यासाठी कनेक्‍टिव्हिटी आणि पर्यटन स्थळांचा विकास केला पाहिजे. नगर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक शहरांमध्ये वाढीला स्कोप आहे. कारण या ठिकाणी पर्यटन स्थळे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचा फायदा या शहरांच्या विकासाला चालना देण्यासाठी होऊ शकतो.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com