आव्हाळवाडीत बांधकाम मजूराचा दगडाने ठेचून खुन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

आव्हाळवाडीत बांधकाम मजूराचा दगडाने ठेचून खुन

पुणे : बांधकाम प्रकल्पावर काम करणाऱ्या एका मजुराचा अनोळखी व्यक्तींनी दगडाने ठेचून खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. हि घटना मंगळवारी सायंकाळी सहा ते बुधवारी दुपारी तीन या वाघोली येथे घडली. विष्णू सुनिल दास (वय 40, रा. गणेशनगर, वाघोली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस पाटील उमेश बबन आव्हाळे (वय 39 ,रा.आव्हाळवाडी) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News)

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू दास हा मुळचा पश्‍चिम बंगालमधील कलकत्ता येथील असून तो दोन वर्षांपासून वाघोली येथील गणेश नगर परिसरात त्याच्या पत्नीसमवेत राहतो. दोघेली पती-पत्नी जवळच्याच एका बांधकाम प्रकल्पावर रोजंदारीवर काम करतात. दास यास दारुचे व्यसन होते. मंगळवारी वाघोली येथील आठवडा बाजार होता. बाजाराची कामाला सुट्टी असल्याने तो दुपारी बाजारात गेला होता, त्यानंतर तो घरी आला. सायंकाळी पुन्हा तो बाहेर गेला.

हेही वाचा: 'देशात पॉर्न पाहण्याचं कारणं सनी लिओनी, तिच्यावर कारवाई का नाही?'

मात्र रात्र उलटल्यानंतरही तो घरी न आल्याने त्याच्या पत्नीने त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. तरीही तो आढळून आला नाही. बुधवारी दुपारी आव्हाळवाडी येथील राजेश घुले यांच्या शेतात त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या डोक्‍यावर दगडाने मारहाण केल्याचे व्रण आहेत. या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दास हा बाजारात गेला होता, तेथे त्याची काही लोकांसमवेत भांडणे झाली होती, त्यातुनच खुनाची घटना घडली असण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार करीत आहेत.

Web Title: Construction Worker Death

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newscrimewagholi
go to top