बांधकाम कामगारांची आता ऑनलाइन नोंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता कामगारांची ऑनलाइन पद्धतीने नोंद करण्यात येत आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांना ‘स्मार्टकार्ड’ देण्यात येणार आहे.

पुणे - महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता कामगारांची ऑनलाइन पद्धतीने नोंद करण्यात येत आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांना ‘स्मार्टकार्ड’ देण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंडळाच्या वतीने कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या २९ योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांची नोंद असणे आवश्‍यक आहे. मात्र, कामगार विभागातील अपुरे मनुष्यबळ आणि कामगार कागदपत्रांची पूर्तता करीत नसल्याने नोंदणीत अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे ही नोंदणी प्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात येणार आहे. बांधकाम मजुरांसह इमारत व इतर बांधकामाच्या व्याख्येत बसणाऱ्या २१ प्रकारच्या कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होईल. काही उपक्रमांच्या माध्यमातून कामाच्या ठिकाणी जाऊनही नोंदणी केली जाणार आहे. मात्र, धर्मादाय आयुक्त व इतर सरकारी कार्यालयांमधील नोंदणी सुरूच असेल, कामाच्या ठिकाणीच नोंदणी झाल्यास कर्मचाऱ्यांना प्रत्येक वेळी कार्यालयात यावे लागणार नाही, अशी माहिती महामंडळाचे सचिव एस. सी. श्रीरंगम यांनी दिली. 

येथील कामगारांच्या नोंदणीसाठी वाकडेवाडी येथील अप्पर कामगार आयुक्तालयात केंद्र उभारले आहे. त्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. वयाचा पुरावा, ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी व ओळखपत्र पुरावा आणि पासपोर्ट आकाराचे तीन फोटो अशा बाबी नोंदणीसाठी आवश्‍यक आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Construction workers are now registered online