बांधकाम कामगारांना मिळणार तीन हजारांचे अर्थसहाय्य 

डी. के. वळसे पाटील
Friday, 14 August 2020

या निर्णयाचा फायदा दहा लाख कामगारांना होणार आहे. अर्थसहाय्य वाटपासाठी मंडळामार्फत ३०० कोटी रुपये खर्च होईल. घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी  करण्याचे निर्देश

मंचर (पुणे) :  इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामगारांना तीन हजार रुपयांचा अर्थसहाय्याचा दुसरा हप्ता मंजूर करण्याचा निर्णय कामगार विभागाने शुक्रवारी (ता. १४) घेतला आहे. 

पुण्यात धावणार 100 कोरोनामुक्त रिक्षा

या निर्णयाचा फायदा दहा लाख कामगारांना होणार आहे. अर्थसहाय्य वाटपासाठी मंडळामार्फत ३०० कोटी रुपये खर्च होईल. घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी  करण्याचे निर्देश महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास दिले आहेत, अशी माहिती कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ते म्हणाले की, या निर्णयाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहमती दिली आहे. जेष्ठ नेते शरद पवारही याबाबत आग्रही होते. कोविड -१९ या विषाणूच्या प्रादूर्भाव कालावधीत दोन हजार रुपये अर्थसहाय्याचा पहिला हप्ता एप्रिल २०२० मध्ये मंजूर करण्यात आला होता. या निर्णयानुसार जुलै २०२० पर्यंत राज्यातील नऊ लाख चौदा हजार ७४८ बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात अर्थसहाय्याची रक्कम जमा करण्यात आली. यासाठी मंडळाने १८३ कोटी रुपये खर्च केले. सध्या राज्यात लॉकडाउन कालावधीला टप्प्या टप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. तथापि, इमारत व इतर बांधकामे अद्यापही पूर्ववत सुरू झालेली नाही. त्यामुळे बांधकाम कामगांराना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे."

दहा लाख कामगारांना लाभ
 - दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता एप्रिल २०२० मध्ये दिला.
 - पहिल्या हप्त्यासाठी १८३ कोटी रुपये खर्च केले.
 - आता तीन हजार रुपायंचा दुसरा हप्ता देणार.
 - आता ३०० कोटी रुपये खर्च होणार आहे. 
 - निर्णयाचा फायदा दहा लाख कामगारांना होणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Construction workers in the state will get financial assistance of three thousand rupees