

पुणे - पुणे महापालिकेतील रस्ते आणि पथ विभागाच्या निविदा वादात सापडत असल्याने या दोन्ही विभागाच्या कामकाजात सुधारणा केल्या जात आहेत. त्यातूनच या विभागांमध्ये सल्ला देणाऱ्या संस्थांचा पत्ता कट करत त्यांचे करार महापालिकेने तडकाफडकी संपुष्टात आणला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हा निर्णय घेतला आहे.