शिक्रापूर - शिक्रापूर-चाकण रस्त्यावर एका कंटेनरने वीसहून अधिक वाहनांना धडक दिल्याची तीन महिन्यांपूर्वीची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता. ६) सायंकाळच्या सुमारास तळेगाव ढमढेरे गावाजवळ बेधुंद अवस्थेत असलेल्या कंटेनर चालकाने दोन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात शिक्रापूर (ता. शिरूर) येथील दिलीप सुभाष खोचरे (वय ६८) या ज्येष्ठाचा मृत्यू झाला.