प्लेझर स्कुटीला कंटेनरची धडक; महिला जागीच ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

दौंड तालुक्यातील कुरकुंभ हद्दीत पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्लेझर स्कुटीला कंटेनरने पाठीमागून जोरात धडक दिल्याने स्कुटीवरील एका महिला गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाली.

प्लेझर स्कुटीला कंटेनरची धडक; महिला जागीच ठार

कुरकुंभ - दौंड तालुक्यातील कुरकुंभ हद्दीत पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्लेझर स्कुटीला कंटेनरने पाठीमागून जोरात धडक दिल्याने स्कुटीवरील एका महिला गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाली. तर दुसरी महिला जखमी झाली. या दोघी बहिणी असून मिरजगाव (ता. कर्जत, जि. अहमदनगर) येथील राहणाऱ्या आहेत.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या प्लेझर स्कुटीला (एमएच. १६, बीएच. ०३५२) कुरकुंभ हद्दीतील गिरमेवस्तीजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने (एनएल. ०१, एडी. ९१९४) पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात स्कुटीवर प्रवास करणाऱ्या दोन सख्या बहिणी जखमी झाल्या. दोघींपैकी सारीका गोकुळ खोडवे (वय ३०, रा. मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) या गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाल्या. तर प्रियंका नवनाथ काळे या जखमी झाल्या.

याप्रकरणी संजय ज्ञानदेव गबले (रा. झगडेवाडी, ता. दौंड) यांनी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणी कंटेनरचालक सिदप्पा लक्ष्मण देवकाते (वय ५०, रा. राजौरी, जि. सोलापूर) यांच्याविरूध निष्काळजीपणे वाहन चालवून महिलेच्या मृत्यू कारणीभूत ठरल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

Web Title: Container Dash To Pleasure Scooty Women Death

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :accidentdeathwomen