esakal | तुमचं गाव कंटेन्मेंट झोनमध्ये तर नाही ना? पुणे जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन जाहीर!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Restricted-Area

सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक, प्रशिक्षण, कोचिंग संस्था बंद राहतील. तथापि दुरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण सुविधा सुरू राहील.

तुमचं गाव कंटेन्मेंट झोनमध्ये तर नाही ना? पुणे जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन जाहीर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 11 तालुक्यांमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव विचारात घेऊन प्रतिबंधित क्षेत्र (कन्टेनमेन्ट झोन) जाहीर करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तालुका आणि प्रतिबंधित गावांची नावे : 

बारामती तालुका : 
माळेगाव बुद्रुक, कटफळ, वडगाव निंबाळकर 

इंदापूर तालुका : शिरसोली

हवेली तालुका : 
मांजरी खुर्द गावठाण, मांजरी बु., झेड कॉर्नर, महादेवनगर, शिवजन्य सोसायटी- भंडलकरनगर, कदमवाकवस्ती- स्वामी विवेकानंद- कवडीमाळवाडी, लोणीकाळभोर-गावठाण-विश्वराज हॉस्पिटल परिसर,  फुरसुंगी-हांडेवाडी, फुरसुंगी -पिसोळी-अंतुलेनगर,  वाघोली-केसनंद-जोगेश्वरीरोड- सदगुरुपार्क, पेरणे-लोणीकंद गावठाण, वाघोली- गो-हेवस्ती, फुलमळा, गाडेवस्ती, आजाळवाडी रोडवरील गणेशनगर, गणेशपार्क कावडेवाडी, बकोरी-प्रिस्टीनसिटी फेज-१,  किरकटवाडी-कोल्हेवाडी,  कोल्हेवाडी (खडकवासला), जे.पी.नगर गोसावी बस्ती (नांदेड), कोंढवे धावडे- ग्रीन कंट्री सोसायटी परिसर, नरहे  गोकुळनगर, नवदीप सोसायटी ते देवर्षी कॉम्पलेक्स, कंजावस्ती कृष्णाईनगर, भिलारवाडी,  जांभुळवाडी-गावठाण, उरळी कांचन -आश्रमरोड, खानापूर.

- Big Breaking : पुण्यात कोरोनाचा हाहाकार; रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक!

शिरूर तालुका : 
माळवाडी परिसर (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक आस्थापना वगळून), तळेगांव ढमढेरे गावठाण, शिवतक्रार म्हाळुंगे, कवठे यमाई, टाकळीभीमा

वेल्हा तालुका : 
सुरवड, कोदवडी, सोंडे  कारला, वडगाव झांजे

दौंड तालुका : 
राज्य राखीव बल गट क्र. 5 आणि 7,  सीआरपीएफ प्रशिक्षण वसतिगृह नवीन परिसर, दहिटणे, मिरवाडी, नांदुर, खामगांव, गणेशनगर, देवकरमळा, बैलखिळा, डुवेवाडी, मेरी मेमोरियल हायस्कुल गिरीम, दौंड शहर व बिगर नगरपालिका हद, गोपाळवाडी म्हसोबा मंदिर, भोहिटे नगर, गोपाळवाडी एस्सार पेट्रोल पंप, दत्तनगर व जिजामाता शाळा परिसर, लिंगाळी माळवाडी (वेताळनगर), म्हसनरवाडी (जगताप व जगदाळे वस्ती), सोनवडी, पवार वस्ती, दळवीमळा.

- पुण्यातील गणेश मंडळांचा 'तो' निर्णय स्वागतार्ह; राज्यातील सर्व गणेश मंडळांना उपमुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन!

खेड तालुका :
राक्षेवाडी, चाकण येथील झित्राईमळा प्रभाग क्रमांक दोन
मावळ तालुका :
माळवाडी, तळेगाव शहर, अहिरवाडी, वेहेरगाव, दहिवली, चांदखेड

पुरंदर तालुका : खोमणे आळी

मुळशी तालुका :
भोईरवाडी येथील मेगापोलीस सिटी इमारत ए- 20, जांबे

आंबेगाव तालुका : साकोरे

- आता घरबसल्या मिळणार पहिली ते बारावीची पाठ्यपुस्तके; 'बालभारती'कडे करा 'ऑनलाईन ऑर्डर'!

प्रतिबंधित क्षेत्रात 31 मे पर्यंत पुढील बाबी बंद राहतील:-

- आंतरराष्ट्रीय हवाई सेवा, सर्व प्रवासी रेल्वे सेवा वाहतूक,
सार्वजनिक बस वाहतूक, मेट्रो रेल्वे सेवा, आतंरजिल्हा आणि आंतरराज्यीय वाहतूक बंद राहील.

- सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक, प्रशिक्षण, कोचिंग संस्था बंद राहतील. तथापि दुरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण सुविधा सुरू राहील.

- सर्व सिनेमा हॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, खेळ संकुले, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, चित्रपटगृह, बार आणि सभागृह.

-  सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि इतर मेळावे.

- सर्व धार्मिक स्थळे, पूजेची, प्रार्थनेची ठिकाणे नागरिकांसाठी बंद राहतील. तसेच धार्मिक स्थळांवर गर्दी करण्यास मनाई राहील.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा