Big Breaking : पुण्यात कोरोनाचा हाहाकार; रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

शहरात आतापर्यंत 37 हजार 35 नागरिकांची तपासणी केली असून, त्यातील 4107 जणांना कोरोना झाला आहे.

पुणे : पुण्यातील कोरोनाचा रुग्णांचा गुरुवारचा (ता.21) आकडा हा खरोखरीच धडकी भरविणारा आहे, याआधीच्या आकड्यांचे उच्चांक मोडीत रुग्ण संख्येने 208 हा नवा उच्चांक गाठला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

एवढ्या प्रमाणात रुग्ण सापडण्याचे कारणही तसे आहे; गुरूवारी सर्वाधिक म्हणजे, सुमारे पावणेदोन हजार नागरिकांची तपासणी झाल्याने इतक्‍या रुग्णांची नोंद झाली आहे. अर्थात, तपासणीचा वेग वाढू लागताच रुग्णांची भर पडत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट आहे. 

- 'ग्राहका, कधी रे येशील?' पुण्यात दुकाने उघडली, पण खरेदीसाठी कुणी फिरकलंच नाही!

दुसरीकडे, नव्या रुग्णांचा आकडा ऐकणाऱ्यांना एक दिलासाही मिळाला आहे; तो म्हणजे 159 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचा. तर मृतांची संख्या थोडीशी कमी होऊन दिवसभरात 7 रुग्णांचा बळी गेल्याने आतापर्यंत 227 रुग्ण मरण पावले आहे. मात्र, विविध रुग्णालयांतील 169 रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यातील 44 रुग्ण व्हेंटिलेवर आहेत. मृतांमध्ये सर्वजण 40 आणि 60 पेक्षा अधिक वयाची व्यक्ती होती. त्यांना इतरही आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

- पुण्यातील गणेश मंडळांचा 'तो' निर्णय स्वागतार्ह; राज्यातील सर्व गणेश मंडळांना उपमुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन!

पुण्यात आतापर्यत रोज दीड हजार नागरिकांची तपासणी करण्यात येत होती. याआधी गेल्या आठवड्यात सर्वाधिक 1 हजार 30 जणांची तपासणी झाली; तेव्हा 201 आणि 202 रुग्ण आढळून आले. मात्र, गुरुवारी तपासणीचा आकडा सतराशेच्या पुढे गेला आणि रुग्ण संख्येने 208 पर्यंतचा पल्ला गाठला. पहिल्यांदाच इतके रुग्ण साडपल्याने पुन्हा भीती पसरली आहे. 

- आता घरबसल्या मिळणार पहिली ते बारावीची पाठ्यपुस्तके; 'बालभारती'कडे करा 'ऑनलाईन ऑर्डर'!

शहरात आतापर्यंत 37 हजार 35 नागरिकांची तपासणी केली असून, त्यातील 4107 जणांना कोरोना झाला आहे. त्यातील 2 हजार 128 रुग्ण ठणठणीत झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. तर आतापर्यंत 227 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या महापालिकेच्या रुग्णालयांसह सूसन आणि खासगी रुग्णालयांत 1 हजार 698 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune 208 new corona patients found on thursday 21st May 2020