
कात्रज : स्वारगेट पाणीपुरवठाविभागाअंतर्गत महर्षिनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून गढूळ व मातकट स्वरूपाचं दूषित पाणी नळाद्वारे येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकूर बेकरी, संत नामदेव हायस्कूल, टिळक महाराष्ट्र विद्यापीठामागील विभागांत हा दूषित पाणीपुरवठा होत आहे.