वडगाव शेरी - संजय पार्क, विमान दर्शन सोसायटी येथे गेले तीन महिन्यांपासून मैला मिश्रित दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना उलट्या, जुलाब आणि पोटाचे अजार वाढले आहेत. अनेकदा तक्रार करूनही प्रशासन ढिम्म असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.