कुणाल कामरावर खटला दाखल; पुण्यातील वकीलांची सुप्रीम कोर्टात याचिका

Kunal_Kamra
Kunal_Kamra

पुणे : सर्वोच्च न्यायालयासंदर्भात केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरोधात अखेर न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला दाखल झाला आहे. पुण्यातील विधीचे दोन विद्यार्थी आणि तीन वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात हा खटला दाखल केला आहे.

कामरा विरोधात सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला चालविण्यास ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी गुरुवारी परवानगी दिली होती. त्यानुसार हा खटला दाखल करण्यात आल्याची माहिती याचिकाकर्ते वकील अभिषेक रासकर यांनी दिली. आर. भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर काही वेळातच कुणाल कामरा यांनी ट्विटकरून नाराजी व्यक्त केली होती. त्यात सर्वोच्च न्यायालयास सर्वोच्च जोकची उपमा देण्यात आली आहे. त्यामुळे या ट्विटबद्दल कामरा यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी रासकर आणि विधीच्या विद्यार्थ्यांनी यांनी केली होती. तसे पत्र त्यांनी ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना पाठवले होते. विधीचे विद्यार्थी श्रीरंग कातनेश्‍वरकर, नितिका दुहाल, मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्‍टिस करणारे वकील अभिषेक रासकर, ऍड. सत्तेंद्र मुळे आणि ऍड. अमेय शिरसीकर यांनी या बाबत याचिका दाखल केली आहे.

वादग्रस्त ट्विट करून कामरा काय सिद्ध करू पाहत आहेत? सर्वोच्च न्यायालय आणि एका राजकीय पक्षात साटेलोटे आहे, असे त्यांना दाखवायचे आहे का? तसे काही असेल तर त्यांनी त्याबाबतचे पुरावे द्यावेत. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे. त्यांच्याविरोधात न्यायालयाच्या अवमानाची याचिका आज दाखल झाली आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा ट्‌वीट केले आहे. त्यातून त्यांना या प्रकरणाला राजकीय रंग द्यायचा आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे न्यायालयाने कामरावर योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. त्यावर लवकरच सुनावणी सुरू होईल.
- अभिषेक रासकर, खटला दाखल करणारे वकील

ऍटर्नी जनरलची परवानगी का आवश्‍यक?
न्यायालयाचा अवमान कायदा 1972 नुसार कोणावर खटला दाखल करायचा असेल तर त्यासाठी कलम 15 नुसार ऍटर्नी जनरलची परवानगी आवश्‍यक असते. त्यांनी परवानगी दिल्यानंतर खटला दाखल करता येऊ शकतो. त्यामुळे खटला दाखल करण्याची परवानगी मिळण्याची विनंती करताना हे प्रकरण नेमके काय आहे हे ऍड. रासकर यांनी ऍटर्नी जनरल यांना कळवले होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com