पालिका अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ठेकेदार बेफीकीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रसल्त्यावर आलेले पाणी

पालिका अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ठेकेदार बेफीकीर

उंड्री - पाणी, रस्ते, वीज, ड्रेनेज, अशा सुविधा मिळण्यासाठी आम्ही कर भरतो. मात्र, ससाणेनगर लेन क्र.12 मध्ये मागिल तीन महिन्यांपासून ठेकेदाराने काम केल्यानंतर राडारोडा उचलला नाही, त्यासाठी हडपसर क्षेत्रीय कार्यालय आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही. ठेकेदाराच्या बेफिकीरीपणाचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. ठेकेदार बेफीकीरपणे काम करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी लोकप्रनिधी आणि प्रशासनाची आहे की, सामान्य नागरिकांची आहे, असे संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

ससाणेनगर लेन क्र. 12 मध्ये सांडपाण्याची वाहिनी बदलून नवीन वाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदला. नवीन वाहणी टाकल्यानंतर रस्ता दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदाराचे असून, ते केले की नाही, त्याची शहानिशा करण्याचे काम पालिका अधिकाऱ्यांचे आहे. मात्र, पालिका अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ठेकेदार मोकाट झाले आहेत. या ठिकाणी पडलेल्या राडारोडा ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना अपघाताचा धोका वाढला आहे. लोकप्रतिनिधी आता तरी लक्ष देतील का, अशी विचारणा स्थानिकांनी केली आहे.

Web Title: Contractor Careless Due Unforgivable Negligence Municipal Officials

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsSakalUndri