road digging
sakal
पुणे - शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी केबल टाकण्यात येणार आहे. महापालिकेने पहिल्या टप्प्यात केवळ मध्यवर्ती पेठांमध्ये २८ केबल टाकण्याची परवानगी दिली होती. मात्र, ठेकेदाराने पुढच्या खोदाईची परवानगी न घेता थेट संपूर्ण शहरात शेकडो किलोमीटरची खोदाई केल्याचे समोर आले आहे. ठेकेदाराने परस्पर खोदाई केल्याने त्याला काम थांबविण्यासाठी नोटीस बजावण्यात येणार असल्याचे पथ विभागाने स्पष्ट केले आहे.