पुणे : पर्वती केंद्रात स्फोट, एक कर्मचारी गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

control room of Tanker Point Parvati Jalkendra Explosion one employee injured Pune

पुणे : पर्वती केंद्रात स्फोट, एक कर्मचारी गंभीर जखमी

पुणे : महापालिकेच्या जलकेंद्रांवर दरवर्षी देखभाल दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जात असताना पर्वती जलकेंद्र येथील टँकर प्वाइंटच्या नियंत्रण कक्षात आज सकाळी मोठा स्फोट होऊन एक कर्मचारी भाजून गंभीर जखमी झाला आहे. या स्फोटामुळे पर्वती येथील टँकर भरणा व्यवस्थाही ठप्प झाली आहे. लाला बांदल हे घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बांदल यांच्याकडे पर्वती जलकेंद्रातील टँकर भरणा केंद्राचे चालू व बंद करण्याची जबाबदारी आहे. आज सकाळी सात वाजता बांदल यांनी मोटर सुरू करण्यासाठी बटन दाबताच तेथे शॉटसर्किट होऊन मोठा स्फोट झाली.

या आगीत बांदल सापडल्याने भाजले. या केंद्रावर उपस्थित असलेले इतर कर्चमारी मोठा स्फोट झाल्याने पळत गेले. त्यांनी भाजलेल्या अवस्थेत असलेल्य बांदल यांना रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर महावितरणच्या अभियंत्यांनी तपासणी केली, पण त्यांना या स्फोटाचे नेमके कारण कळू शकलेले नाही. आता राज्य शासनाचे विद्युत निरीक्षक यांच्या मार्फत तपासणी केली जाणार असून, त्यानंतरच या घटनेचे कारण कळू शकणार आहे.

तीन दिवस टँकर भरणा बंद

टँकर भरणा केंद्राची विद्युत यंत्रणा या स्फोटामध्ये नष्ट झाली आहे, त्यामुळे त्याची दुरुस्ती करण्यासाठी तीन दिवस टँकर भरणा केंद्र बंद असणार आहेत. या ठिकाणी सात प्वाइंट असून, तेथून रोज शंभरपेक्षा जास्त टँकरमध्ये पाणी भरले जाते, पण हे केंद्र बंद पडल्याने टँकरने केला जाणारा पाणी पुरवठा विस्कळित झाली आहे. हे केंद्र शुक्रवारी (ता. ५) सुरू होतील, असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख पावसकर यांनी सांगितले.

‘या घटनेची महावितरणच्या अभियंत्यांनी प्राथमिक तपासणी केली आहे. मात्र, त्यांना घटनेचे कारण कळू शकले नाही. त्यामुळे उद्या राज्य शासनाचे विद्युत निरीक्षक हे घटनेची तपासणी करणार आहेत. तसेच स्फोट झालेल्या खोलीत सीसीटीव्ही यंत्रणा होती, त्याचा डीव्हीआर सापडला असून त्याची तपासणी पोलिस करणार आहेत. यावरून हा प्रकार कसा घडला समजण्यास मदत होणार आहे.’’

- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा

Web Title: Control Room Of Tanker Point Parvati Jalkendra Explosion One Employee Injured Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top