Municipal Commissioner naval kishor ram
sakal
पुणे - पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना वादग्रस्त मेसेज टाकल्याप्रकरणात अधीक्षक अभियंता असित जाधव यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. आज (ता. १६) स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. त्यात आयुक्तांना पाठवलेला मेसेज फेक असू शकतो, त्यामुळे याची चौकशी करा, सायबर पोलिसांकडे तक्रार करा, अशी अजब सूचना नगरसेवकांनी केली आहे. या माध्यमातून अधिकारी आणि दलाल यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.